Jump to content

राम पुनियानी

राम पुनियानी

प्रा. राम पुनियानी लेखक आहेत. हे २००० सालापासून भारतात धर्मनिरपेक्षवादी विचारांची मांडणी करीत आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसात्मक हल्ल्याच्या चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पुनियानी यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. संघाच्या हुकुमशाही विचारांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले आहेत. इंदिरा गांधी नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल कम्युनल हार्मनी अ‍ॅवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.[]

पुण्यात २१ आणि २२ मे २०१६ रोजी झालेल्या १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१४व्या विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादांचे विषय :

  • असहिष्णू साहित्य संस्कृतीचा भूतकाळ आणि आजचे वास्तव
  • भारतीय राष्ट्रवादाचा पाया - बौद्ध तत्त्वज्ञान
  • कृषी संस्कृती उद्ध्वस्त होत आहे
  • समरसता, सामाजिक समता आणि जातिअंत

विद्रोही साहित्य संमेलनातील डॉ. राम पुनियानी याच्या भाषणाचा सारांश

'आरएसएस'ने देश घडविण्यापेक्षा कवायती करण्यालाच प्राधान्य दिले. स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या लढ्यात त्यांनी कधीच योगदान दिले नाही. आता 'आरएसएस' आणि भाजप सरकार सर्वसामान्यांच्या मनात सांस्कृतिक गोंधळ निर्माण करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारल्याचा आव आणून जुन्या मूल्यांनाच आधुनिक पद्धतीने मांडून पुरोगामी विचार संपविण्याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी दलित, विद्यार्थी, स्त्रिया आणि कामगारांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.

देशात गेल्या काही वर्षांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या त्यातून करण्यात आल्या. हिंदू राष्ट्रवाद राबविण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. हिंदूराष्ट्र ही संकल्पना लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या विरोधी आणि सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. त्यांना मनुस्मृतीवर आधारित हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यांचा हा हिंदू राष्ट्रवाद सामाजिक परिवर्तनात अडथळा ठरत आहे.

संमेलनातील वैद्य, पोकळे आणि पाटील यांच्या भाषणांचा सारांश

देशासमोर आज जमातवादाचे मोठे आव्हान आहे. सर्व संकटे पुरोगाम्यांनी लक्षता घ्यायला हवीत. 'सबका साथ, सबका विकास' हा भुलभुलैय्या आहे,' असे वैद्य यांनी सांगितले. 'आंबेडकरी, आदिवासी आणि ग्रामीण ही आमची विद्रोह्यांची फाटाफूट नाही. याउलट 'आरएसएस'च्या विरोधात कायम लढणे हेच आमचे ध्येय आहे,' असे पोकळे यांनी सांगितले.

'प्रमाण भाषा आणि भाषा शुद्धतेच्या आग्रहामुळेच मराठी भाषेचे नुकसान झाले आहे. मराठी संस्कृतपेक्षा प्राचीन भाषा असूनही तिला संस्कृतचे अपत्य मानले जाते. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात अडथळे येत आहेत,' असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. 'मराठी साहित्याची भाषा सदाशिवपेठी मराठीच राहिली आहे. या भाषेने गाव खेड्यातील, बहुजन व सर्वसामान्यांची भाषा कधीच स्वीकारली नाही. प्रस्थापितांच्या संमेलनात स्थान न मिळाल्यामुळेच दलित, आदिवासी यांसारखी संमेलने झाली,' असेही ते म्हणाले.

पुस्तके

  • Ambedkar and Hindutva Politics (इंग्रजी, २०१६)
  • आंबेडकर अौर हिंदुत्व राजनीति (अनुवादित, हिंदी सहअनुवादक - अमरीश हर्डेनिया.) (मराठी अनुवाद - आंबेडकर आणि हिंदुत्ववादी राजकारण. अनुवादक सुकुमार दामले, २०१८)
  • Indian Nationalism Under Threat Gandhi's Assassination : Godse and RSS Connection (इंग्रजी, २०१७)
  • Contours of Hindu Rashtra: Hindutva, Sangh Parivar and Contemporary Politics (इंग्रजी, २००६)
  • Communal Threat to Secular Democracy (इंग्रजी, २०१०)
  • Communalism : India's Struggle for Democracy and Pluralism (Critical Debates on History & Politics) (इंग्रजी, अागामी जानेवारी-२०१९)
  • Communalism Explaimed : A Graphic Account (सहलेखक - शरद शर्मा, इंग्रजी, २०१८)
  • Communal Politics: Facts versus Myths (इंग्रजी, २०१८)
  • Caste, Hindutva and Dalits (इंग्रजी, २०१७)
  • Truth in Fetters : Broken Promises and Shattered Unity (इंग्रजी, २०१८)
  • Deconstructing Terrorist Violence: Faith as a Mask (इंग्रजी, २०१५)
  • धर्म सत्ता आणि हिंसा (हिंदी, संपादित, २०१६)
  • Partition, Indo-Pak Relations and Kashmir (इंग्रजी, २०१८)
  • Fascism, in India : Debating RSS - BJP Politics, (इंग्रजी, २०१७)
  • Mumbai Post 26/11 : An Alternate Perspective (इंग्रजी, डिसेंबर २००९)
  • Muslims in Indian Democracy (इंग्रजी, २०१२)
  • Religion, Liberation Theology and Modern Godmen (इंग्रजी सहलेखक - उदय मेहता, २०१८)
  • Rेeligion, Science and Society : Indian Context (इंग्रजी, २०१७)
  • सांप्रदायिकता (हिंदी सहलेखक, शरद शर्मा, २०११)
  • Secularism in India : Concept and Practice (संपादित, सहसंपादक उदय मेहता, इंग्रजी, २०१७)
  • Hindu Extreme Right Wing Groups : Ideology and Consequences (इंग्रजी, २००४)
  • Haider Ali, Tipu Sultan Sthapit-Sultanat e Khudadad (अनुवादित, मूळ हिंदी-मराठी लेखक - सरफराज अहमद २०१६)
  • हैदरअली, टिपू सुलतान स्थापित - सल्तनत-ए-खुदादाद (अनुवादित, मूळ मराठी लेखक - सरफराज अहमद २०१६)[]

संदर्भ

  1. ^ "राम पुनियानी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-05-26.
  2. ^ "Ram Puniyani". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-10-15.