Jump to content

राम नगरकर

राम विठोबा नगरकर (जन्म : सारोळे, ५ एप्रिल १९३०; मृत्यू : ८ जून १९९५) हे एक मराठी विनोदी नट होते. ते मूळ व्यवसायाने नाभिक असून मुंबईत त्यांचे वंदन हेअर कटिंग सलून होते.

नगरकरांनी मराठी रंगभूमी चित्रपटांतून विनोदी भूमिका केल्या.

नगरकर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील सारोळे या गावाचे रहिवासी होते. १९४७ च्या सुमारास त्यांना गाव सोडून मुंबईत यावे लागले. येथे त्यांचा परिचय एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, तसेच निळू फुले आणि दादा कोंडके यांच्याशी झाला. हे सर्वजण पथनाट्यांतून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. राम नगरकर त्यांना सामील झाले.१९४७ नंतर?

कलापथकातील मैत्रीमुळे दादा कोंडके आणि नगरकर यांनी विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू केले. त्याचे महाराष्ट्रभर हजारो प्रयोग झाले. नंतर निळू फुले आणि नगरकर यांची कथा अकलेच्या कांद्याची आणि राजकारण गेलं चुलीत ही दोन लोकनाट्ये लोकप्रिय झाली. एकोणीसशे सत्तरच्या दशकात राम नगरकर यांचे हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, बायांनो नवरे सांभाळा, लक्ष्मी आणि एक डाव भुताचा हे लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित झाले.

नगरकरांनी रामनगरी हे आत्मकथन लिहिले. त्याला पुलंची प्रस्तावना आहे. हे पुस्तकही लोकप्रिय झाला. या पुस्तकावरून रामनगरी नावाचा हिंदी चित्रपट निघाला. अमोल पालेकर यांची निर्मिती असलेल्या त्या चित्रपटात स्वतः पालेकर, निळू फुले, सुहासिनी मुळगावगर आणि नगरकरांच्या प्रमुख भूमिका होत्या.

नगरकर हे रामनगरीमध्ये सांगितलेल्या किश्श्यांचे एकपात्री कार्यक्रम करीत. देशांत आणि परदेशांत त्यांनी असे हजाराहून अधिक कार्यक्रम केले. यात ते स्वतःचीच थट्टामस्करी करीत असत.

दादा कोंडके, निळू फुले, शाहीर अमर शेख, वसंत बापट, लीलाधर हेगडे, मधू कदम, सुधा वर्दे हे सर्व राम नगरकर यांचे सेवा दलाच्या कलापथकातील सवंगडी होत