राम कदम (आमदार)
रामचंद्र शिवाजी कदम | |
---|---|
राम कदम | |
जन्म: | २४ जानेवारी, १९७२ लातूर, महाराष्ट्र, भारत |
संघटना: | भारतीय जनता पक्ष |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | राज ठाकरे |
रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम (जन्म: २४ जानेवारी, १९७२) हे भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार आहेत. त्यांचा जन्म लातूर येथे झाला.
आमदार राम कदम यांचे निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. ८ नोव्हेंबर २००९ रोजी राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरुवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते.[१][२]
१९ मार्च २०१३ रोजी पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशींना विधान भवनाच्या लॉबीत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे व मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नंतर विधासभाध्यक्षांनी २० मार्च २०१३ रोजी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत त्यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २१ मार्च २०१३ रोजी यांनी मुंबई पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने यांना २२ मार्चपर्यंत २०१३ पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी २२ मार्च २०१३ रोजी त्यांना सत्र न्यायालयात सादर केले. त्यावेळी सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.[३]
राजकीय वाटचाल
वैयक्तिक
संदर्भ
- ^ 'मनसे'च्या आमदारांवरील निलंबन मागे Archived 2011-01-24 at the Wayback Machine. गोविंद येतयेकर, ज्ञानेश्वर बिजले
- ^ मनसेच्या चार आमदारांचे निलंबन रद्द[permanent dead link]
- ^ "आ.राम कदम,क्षितीज ठाकूर कोठडीत". 2013-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- https://www.manase.org/en/home_vs2009.php Archived 2011-10-06 at the Wayback Machine.
- http://www.hindustantimes.com/Golden-MLA-Wanjale-dies/Article1-708159.aspx Archived 2011-06-14 at the Wayback Machine.
- http://news.rediff.com/report/2009/nov/09/four-mns-mla-suspended-for-assaulting-azmi.htm
- http://www.hindustantimes.com/Azmi-attacked-over-Hindi-oath-four-MNS-members-suspended/H1-Article1-474547.aspx Archived 2009-11-12 at the Wayback Machine.