रानपाटचा धबधबा
रानपाटचा धबधबा हा मुंबई- गोवा महामार्गाने प्रवास करताना वाटेत लागतो. महामार्गावरील संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. उक्षी गावापासून गणपतीपुळे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने रत्नागिरीला येताना उक्षी स्थानक ओलांडल्यावर उजवीकडे उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे दर्शन घडते. परिसरातील हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते.