Jump to content

रानगाव

रानगाव हे वसईच्या पश्चिमेला समुद्रकिनारी वसलेले मांगेला कोळी समाजाचे गाव आहे. गाव कोळी समाजाचे असले तरी, शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. गावात मुख्यत्वे मांगेली भाषा बोलली जाते. वसई रोड स्थानका पासून साधारण आठ किलोमीटरवर हे गाव असून, नवघर एस.टी. स्थानक येथून रानगावसाठी बस सेवा उपलब्ध आहे.