राधिका आपटे
राधिका आपटे | |
---|---|
राधिका आपटे | |
जन्म | ७ सप्टेंबर, १९८५ वेल्लोर, तमिळनाडू, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक व चित्रपट) |
भाषा | मराठी हिंदी बंगाली तेलुगू |
प्रमुख चित्रपट | अंतहीन (बंगाली) (२००९) |
पती | बेनेडिक्ट टायलॉर (ल. २०१२) |
राधिका आपटे (जन्म:७ सप्टेंबर, १९८५:वेल्लोर - ) एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते आणि काही तामिळ, मराठी, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. तिने थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली आणि हिंदी फॅन्टसी, वाह! लाइफ हो तो ऐसी! (2005).[ संदर्भ हवा ]
राधिका आपटे मूळची पुण्याची असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिचे शिक्षण झाले. त्यानंतर ती पुण्यातील 'आसक्त' या मराठी नाट्यसंस्थेमध्ये दाखल झाली. तू, पूर्णविराम, मात्र रात्र आणि कन्यादान इत्यादी मराठी नाटकांमधून तिने अभिनय केला. २००९ साली भारतातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या 'अंतहीन' या बंगाली चित्रपटामध्ये तिने 'बृंदा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.[ संदर्भ हवा ]
कारकीर्द
चित्रपट
- वाह्! लाइफ हो तो ऐसी! (हिंदी) (२००५) ... अंजली
- अंतहीन (बंगाली) (२००९) ... बृंदा
- वेटिंग रूम (२०१०) - अप्रदर्शित
- आय ऍम (२०१०) - अप्रदर्शित
- रक्त चरित्र (२०१०) - अप्रदर्शित... परितला सुनीता
- शोर इन द सिटी (२०११)... सपना
- कबाली (२०१७) - प्रदर्शित
- पॅडमॅन (२०१८) - प्रदर्शित
- अंधाधून (२०१८)