रात ढोकरी
रात ढोकरी, रात्रिंचर बगळा, रात बगळा, राजकोक्कू किंवा अंधारी ढोकरी (इंग्लिश:Night Heron) हा एक पक्षी आहे.
याची ओळख म्हणजे हा आकाराने साधारणतः ढोकरी एवढा असतो. हा कुबडी ढोकरीचा भाऊबंद आहे. याची चोच मजबूत असते. याच्या शरीराचा वरील रंग राखी करडा असतो व पाठ तुकतुकीत काळी असते. शरीराचा खालचा भाग पांढरा असतो तसेच शेंडीच्या टोकाची काही पिसे पांढरी असतात. याचे पंख पिवळसर असून, पंखांवर उदी कड्या असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. संध्याकाळ होताच हे पक्षी आकाशातून क्वा... असा आवाज करीत उडतात.
वितरण
श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटावर आढळतात. उन्हाळ्यात काश्मीर आणि नेपाळात एकोणीसशे मीटर उंचीपर्यंत आढळतात. भारतात जून ते जुलै या काळात यांची वीण होते.
निवासस्थाने
झिलानी आणि खाजणीची जंगले तसेच खाड्या.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली