राणाजगजितसिंह पाटील
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील | |
आमदार, तुळजापूर विधानसभा | |
विद्यमान | |
पदग्रहण २५ ऑक्टोबर २०१९ | |
जन्म | ३० ऑक्टोबर १९७१ |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
वडील | पद्मसिंह पाटील |
पत्नी | सौ.अर्चना पाटील (उपाध्यक्ष जि.प. धाराशिव) |
अपत्ये | मल्हार पाटील, मेघ पाटील |
निवास | मू.पो.तेर, ता.जि.धाराशिव. |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | www |
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (३० ऑक्टोबर, १९७१ -) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिले आणि सर्वात तरुण मंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी एमएलसी केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा भाजपच्या तिकिटावर २४००० मतांनी पराभव केला.
वैयक्तिक जीवन
‘धाराशिव येथील कोल्हापूर बंधारे प्रकारातील सर्वात जास्त बंधारे ("के.टी.") बांधण्यासात त्यांचे योगदान आहे. उस्मानाबादला अन्य मागास व मोठ्या प्रमाणात कोरडवाहू मराठवाडा भागातील सर्वात सिंचित जिल्हा बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उद्योग, महसूल, कृषी, सांस्कृतिक कार्य, रोजगार व रोजगार हमी योजना, संसदीय कार्य, जीएडी राज्यमंत्री होते. मंत्रीपदाच्या पहिल्या पदावर त्यांनी सहा विभागांची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनी १९७८ ते २०१९ या काळात महाराष्ट्र विधानसभेत धाराशिव विधानसभेचे १० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील पद्मसिंह पाटील हे २० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र शासनात मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती, विरोधी पक्षनेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (एस) होते. तसेच ते गेल्या ४० वर्षांपासून धाराशिवचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची पत्नी धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.
शैक्षणिक पात्रता
- बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन)
कार्यकाळ
- २००४ - २००९ : कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि
रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
- २००८ ते नोव्हेंबर २००९ : महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व
संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
- २००५ ते २००८ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
- २००८ ते २०१४ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
- ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
- २०१९ - तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवड.
सामाजिक योगदान
- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत धाराशिव जिल्ह्यातील मुलांसाठी शिक्षणाची सोय
- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १ कोटीची मदत
- अनेक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन; २०१७ पासून ६७ मोठी वैद्यकीय शिबिरे घेऊन ६१३४७ रुग्णांची तपासणी करून निदान केले, तर ३९०६ रुग्णांवर निशुल्क उपचार व शस्त्रक्रिया करण्यात यश.
- इतर रुग्णालयामधील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरघोस सहकार्य; धाराशिव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पशू वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून छोट्या शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतण व लसटोचणीचे मोफत आयोजन तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी टॅंकरद्वारे टंचाई काळात विनामूल्य पाणीपुरवठा केला.
- महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ४५ गावांमध्ये ६००० महिलांसाठी शिवण क्लासेस द्वारे प्रशिक्षण.
- धाराशिव
शहरासाठी महत्त्वाकांक्षी अशी उजनी धरणातून १०८ किमी अंतरावरून १८४ कोटी रुपयाची उजनी पाणी पुरवठा योजना सुरू केली.
- रोजगार निर्मिती, कृषि सुधारणा, विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, रेशीम शेती-उद्योग, पॉलिहाऊस-शेडनेटच्या माध्यमातून फुलशेतीस प्रोत्साहन.
- राज्यमंत्री असताना धाराशिव शहरालगत कौडगाव येथे २५०० एकरवर औद्योगिक वसाहतीची स्थापना करून १५०० एकरचे भूसंपादन तसेच महाजनकोच्या ५० मे.वॅ. सोलार ऊर्जा निर्मिती प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. उर्वरित भूसंपादन व उद्योग आणणेसाठी पाठपुरावा. २००८ साली नगरपरिषद व राज्य शासनाच्या वतीने धाराशिव महोत्सव २००८ चे आयोजन
संदर्भ
- अधिकृत संकेतस्थळ
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191103_1_5&arted=Hello%20Osmanabad&width=371px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191025_2_4&arted=Hello%20Osmanabad&width=301px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191031_1_7&arted=Hello%20Osmanabad&width=226px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191025_4_5&arted=Hello%20Osmanabad&width=299px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191025_7_4&arted=Hello%20Osmanabad&width=595px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191025_6_1&arted=Hello%20Osmanabad&width=598px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HOBD_20191025_6_3&arted=Hello%20Osmanabad&width=303px