Jump to content

राज्यसभा

राज्यसभा
प्रकार
प्रकार वरिष्ठ सभागृह
इतिहास
नेते
सभापतीजगदीप धनखड, भाजप
इ.स. २०२२
बहुमत नेता पीयुष गोयल (भारतीय जनता पक्षाचे पक्ष नेता), भाजप
इ.स. २०२१
विरोधी पक्षनेता मल्लिकार्जुन खड़गे, काँग्रेस
इ.स. २०२१
संरचना
सदस्य २५० (२३८ निर्वाचित + १२ नियुक्त)
राजकीय गटसंपुआ
राजकीय गटडावी आघाडी
रालोआ
समिती
List
  • वाणिज्य संबंधी समिती
  • गृह कार्य संबंधी समिती
  • मानव संसाधन विकास संबंधी समिती
  • उद्योग संबंधी समिती
  • विज्ञान आणि प्रौद्योगिकी, पर्यावरण आणि वन संबंधी समिती
  • परिवहन, पर्यटन आणि संस्कृति संबंधी समिती
  • कार्मिक, लोक शिकायत, विधि आणि न्याय संबंधी समिती
  • स्वास्थ्य और परिवार कल्याण संबंधी समिती
निवडणूक
मागील निवडणूकजून ४, २०१४
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली
संकेतस्थळ
राज्यसभेचे संकेतस्थळ
तळटिपा

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली।

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे|Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्याने त्यांना बहुमत मिळून जाते.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

सदस्य पात्रता

  1. राज्यसभेचा सभासद होण्यास तो/ती व्यक्ति भारतीय नागरिक असावी.
  2. वय तीस पेक्षा जास्त असावे.
  3. ही व्यक्ती मानसिक रीत्या निरोगी असून कर्जबाजारीही (दिवाळखोर) नसावी.
  4. ह्या व्यक्तीने शपथपत्र द्यावे ज्यात त्याच्या कोणत्याही अपराधी कारवाई करण्यात आली नाही.
  5. आरक्षित जागांसाठी ही व्यक्ती अनुसुचित जाती/ जमातीतील असावी लागते.

नियुक्ती

राज्यसभा सदस्यांची निवड प्रत्येक राज्यातील विधानसभेमार्फत होते. प्रत्येक राज्यासाठी जागा निर्धारीत आहेत व त्या समान नसून लोकसंख्येप्रमाणे ठरविण्यात आल्या आहेत. २००६ मधील जागांची संख्या पुढील प्रमाणे आहे:

राज्य जागा
अरुणाचल प्रदेश
आंध्र प्रदेश१८
आसाम
उत्तर प्रदेश३१ (फक्त ३० जागा भरल्या आहेत्)
उत्तराखंड
ओडिशा१०
कर्नाटक१२
केरळ
गुजरात११
१०गोवा
११छत्तीसगढ
१२जम्मू आणि काश्मीर
१३झारखंड
१४तमिळनाडू१८
१५त्रिपुरा
१६दिल्ली
१७नागालॅंड
१८पंजाब
१९पुडुचेरी
२०पश्चिम बंगाल१६
२१बिहार१६
२२मणिपूर
२३मध्य प्रदेश११
२४महाराष्ट्र१९
२५मिझोरम
२५मेघालय
२७राजस्थान१०
२८सिक्किम
२९हरियाणा
३०हिमाचल प्रदेश
३१नामांकित१२ (फक्त १० जागा भरल्यात)

एकूण: २४२ []

सदस्यत्व

सत्र

सामान्यतः राज्यसभेचे दर वर्षी ३ सत्र होतात.

संदर्भ

  1. ^ "Alphabetical List of Sitting Members of Rajya Sabha". 164.100.47.5. 2018-05-01 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

  • राज्यसभेच्या विद्यमान खासदारांची यादी
  • लोकसभा

बाह्य दुवे