Jump to content

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात
जन्म ८ एप्रिल १९९८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१४ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट फॅंड्री

राजेश्वरी खरात (जन्म : ८ एप्रिल इ.स. १९९८) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ती विशेषतः ही फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' या नायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले. होते.[][]

पार्श्वभूमी

राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. तिचे शालेय शिक्षण पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत पूर्ण करून तिने सिहगड महाविद्यालयात बी.कॉमसाठी प्रवेश घेतला आहे. ती मूळची विदर्भातील आहे [][]

राजेश्वरी खरात हिने काम केलेले चित्रपट

  • फॅंड्री[]
  • आयटमगिरी[]

संदर्भ

  1. ^ http://www.justmarathi.com/rajeshwari-kharat/
  2. ^ http://starmarathi.in/rajeshwari-kharat-marathi-actress/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2018-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.marathi.tv/actress/rajeshwari-kharat-wiki/
  5. ^ "संग्रहित प्रत". 2018-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-04 रोजी पाहिले.
  6. ^ http://marathistars.com/actress/rajeshwari-kharat/