Jump to content

राजेश खन्ना

राजेश खन्ना
राजेश खन्ना
जन्म २९ डिसेंबर, इ.स. १९४२
अमृतसर, पंजाब (भारत)
मृत्यू १८ जुलै, इ.स. २०१२
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळइ.स. १९६६-इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट आनंद
पत्नीडिंपल कापडिया
अपत्ये ट्विंकल खन्ना, रिंकी खन्ना
अधिकृत संकेतस्थळ

राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.

काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.

त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.

"आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट.

सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरुणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची.

लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकला नाही.

राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला परंतु त्याचा परिणाम राजेश खन्‍नां वर झाला नाहि..

राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषिके

  1. फिल्म फेअर पुरस्कार (१९७१)-उत्कृष्ट अभिनेता
  2. फिल्म फेअर पुरस्कार (१९७२)-उत्कृष्ट अभिनेता
  3. फिल्म फेअर पुरस्कार (१९७५)-उत्कृष्ट अभिनेता
  4. फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (२००५)
  • राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी तीन वेळा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.

प्रमुख चित्रपट

वर्षचित्रपटभूमिकाविशेष माहिती
१९८३अगर तुमना होतेअशोक मेहरा
१९८६अंगारें
१९७४अजनबीरोहित कुमार सक्सेना
१९७१अंदाज़राज
१९७२अनुरागगंगाराम
१९७७अनुरोधअरुण चौधरी/संजय कुमार
१९८६अनोखा रिश्ता
१९७२अपना देशआकाश चंद्र
१९७९अमर दीपराजा/सोनू
१९७१अमर प्रेमआनंद बाबू
१९८६अमृत
१९८५अलग अलग
१९८३अवतारअवतार
१९८२अशान्ति
१९९९आ अब लौट चलें
१९८५आखिर क्यों?आलोक नाथ
१९८०ऑंचल
१९८४आज का एम.एल.ए. राम अवतार
१९७०आनन्द
१९७०आन मिलो सजनाअजित
१९७४आप की कसम
१९६९आराधना
१९८४आवाज़
१९८७आवाम
१९८७आवारा बाप
१९७३आविष्कारअमर
१९८४आशा ज्योतिदीपक चन्दर
१९७७आशिक हूॅं बहारों काअशोक शर्मा
१९८५ऊॅंचे लोग
१९७०कटी पतंगकमल सिन्हा
१९७७कर्मअरविंद कुमार
१९८१कुदरत
२००२क्या दिल ने कहा
१९८७गोरा
१९७७छलिया बाबू
१९७९जनता हवलदार
१९८५ज़माना
१९८२जानवरराजू
१९७२जोरू का गुलामराजेश
१९७७त्याग
१९८०थोड़ी सी बेवफाईअरुण कुमार चौधरी
१९८१दर्द
१९७३दाग
१९७२दिल दौलत दुनियाविजय
१९८५दुर्गा
१९७१दुश्मन
१९६९दो रास्ते
१९८१धनवान
१९८४धर्म और कानून
१९८२धर्म कॉंटा
१९८७नज़राना
१९७३नमक हराम
१९८४नया कदमरामू
१९८५नया बकरा
१९८६नसीहत
१९८२नादानआनंद
१९८५निशान
१९७८नौकरीरंजीत गुप्ता 'रोनू'
१९७७पलकों की छॉंव में
१९८९पाप का अंत
२००१प्यार ज़िन्दगी है
१९७५प्रेम कहानी
१९७४प्रेम नगर
१९७९प्रेम बंधनकिशन/मोहन खन्ना
१९८०फ़िर वही रातडॉ. विजय
१९८०बंदिश
१९६९बंधन
१९६७बहारों के सपने
१९८५बाबू
१९७२बावर्ची
१९८५बेवफ़ाईअशोक नाथ
१९७८भोला भाला
१९८४मकसद
१९७६महबूबा
१९७६महा चोर
१९७२मालिकराजू
१९८५मास्टर जी
१९७९मुकाबलाकव्वाली गायक
१९७२मेरे जीवन साथीप्रकाश
१९८९मैं तेरा दुश्मनशंकर
१९८२राजपूत
१९९१रुपये दस करोड़
१९७४रोटीमंगल सिंह
१९८८विजय
१९७२शहज़ादाराजेश
१९८६शत्रुइन्स्पेक्टर अशोक शर्मा
१९७०सच्चा झूठाभोला/रंजित कुमार
१९७०सफ़रअविनाश
१९८२सुरागपाहुणा कलाकार
१९८३सौतन
१९९०स्वर्ग
१९८५हम दोनों
१९७४हमशक्ल
१९७१हाथी मेरे साथीराज कुमार

चरित्र

राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.

तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे.


बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील राजेश खन्ना चे पान (इंग्लिश मजकूर)