Jump to content

राजेंद्र बर्वे

डॉ. राजेंद्र बर्वे एम.डी.. डी.पी.एम(Diploma in Psychological Medicine)(मुंबई).. एफ.आय.पी.एस. (Fellow of Indian Psychiatric Society) हे एक मनोविकारतज्‍ज्ञ असून मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. मुंबई विद्यापीठातून ते डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर बोस्टन्च्या टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. स्ट्रेस मॅनेजमेन्ट (मानसिक ताण व्यवस्थापन)या विषयावर ते कार्यशाळा घेतात.

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दैनिक सकाळ, मनमोराचा पिसारा(दैनिक लोकसत्ता) आणि साप्ताहिक लोकप्रभा या नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे.

डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या पत्नी ललिता बर्वे या मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत, द्वितीय क्रमांकाने एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक असल्याने त्या डॉ. राजेंद्र काळे यांच्या काही पुस्तकांच्या सहलेखिका आहेत.

राजेंद्र बर्वे यांच्या वृत्तपत्रीय लेखांचे काही मथळे
  • डार्विनच्या मनाचं कोडं (दैनिक लोकसत्ता, २६-११-२०१२)
  • दबंग डरायविंग (मनमोराचा पिसारा-लोकसत्ता)
  • विपश्यना’ : एक आर्त अनुभूती (२००४सालच्या एका दिवाळी अंकातला लेख)
  • हाच आपला कट्टा (मनमोराचा पिसारा-लोकसत्ता)
  • का होतो माणसाचा सैतान (दैनिक सकाळ २९-१-२०१२)

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी लिहिलेली मनोविज्ञान/व्यक्तिविकासावरील पुस्तके

  • आत्मविश्वासाकडे वाटचाल
  • एकदा काय झालं (कथासंग्रह)
  • कथा पालकांच्या, व्यथा मुलांच्या
  • गुडमॉर्निंग टिप्स : तरतरीत दिवसासाठी
  • गुडमॉर्निंग टिप्स : प्रसन्न विचारांसाठी
  • चुकण्यापूर्वी ... अ
  • जगणं हीच गंमत (हॅव अ नाइस डे)
  • झटकून टाक जीवा...(नैराश्यावर मात)
  • टफ माइंड सॉलिड मनाचा दिंडी दरवाजा
  • डिसिजन्स : निर्णायक क्षणांचा साथीदार
  • तुमची झोप तुमच्या हाती
  • फुलोरा : व्यक्तिमत्त्व विकासाचा वैज्ञानिक मागोवा (सहलेखिका ललिता बर्वे)
  • भयगंड तुमचे ... उत्तर माझे
  • मनातलं ... मनापासून
  • मानसिक ताण-तणाव कसा रोखाल
  • मानसिका
  • यातून मार्ग काय? (सहलेखिका ललिता बर्वे)
  • विसंवादातून ... सुसंवादाकडे
  • सकाळ -- प्रफुल्ल - प्रत्येक व्यक्ती, प्रति परमेश्‍वर ( डॉ. राजेंद्र बर्वे )
  • सवयीचे गुलाम (हॅबिट, ईव्हन इफ यू रिमुव्ह एच ॲबिट रिमेन्स, ॲन्ड ईव्हन यू रिमुव्ह ॲब इट रिमेन्स)




पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर ; शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे