Jump to content

राजारामशास्त्री भागवत

राजाराम
जन्म नाव राजाराम रामकृष्ण भागवत
टोपणनाव राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत
जन्म ११ नोव्हेंबर,इ.स. १८५१
कशेळी गाव तालुका राजापूर
मृत्यू ४ जानेवारी, १९०८
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र संस्कृत प्राधापक, सुधारणा चळवळी, साहित्य, संशोधन,विचारवंत
भाषामराठी
साहित्य प्रकार संशोधनपर
कार्यकाळ १८७७ ते १९०८
विषय संस्कृत भाषा आणि भाषाअभ्यास
चळवळ सामाजिक धार्मिक सुधारणा
प्रभावितधोंडो केशव कर्वे

आचार्य राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत, (११ नोव्हेंबर,इस १८५१ -मृत्यू:४ जानेवारी,इस १९०८) हे संस्कृत भाषेचे प्राध्यापक,भाषाभ्यास विषयाचे अधिव्याख्याता, समाज सुधारणांमध्ये विश्वास ठेवणारे विचारवंत होते.[]

व्यक्तिगत जीवन आणि शिक्षण

राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत यांचा जन्म राजापूर तालुक्यातील कशेळी गावी झाला. शिक्षण मुंबईस झाले. इ.स. १८६७ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षें मेडिकल कॉलेजात घालविली. पण पुढे तो अभ्यासक्रम सोडून संस्कृतचा अभ्यास केला. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गा भागवत यांच्या आजीचे बंधू होते. ते कट्टर सुधारक व स्पष्टवक्ते होते. अस्‍पृश्य जातींच्या उन्नतीविषयी त्यांना मोठी कळकळ वाटे.[] राजारामशास्त्री भागवत हे एक चांगले अध्यापक होते. त्यांना विद्यार्थ्याबाबत विशेष आदर वाटे.

उपक्रम संकेतस्थळावर लेखक धनंजय यांच्या मतानुसार, राजारामशास्त्रींचे बरेचसे लेखन सामाजिक विषयांबद्दल होते. त्यांनी हाताळलेले विषय मुखतः (१) चातुर्वर्ण्य आणि जातिभेद (विरोध), (२) धार्मिक कर्मकांडांत सुधारणा - मुंजी सर्वांच्या कराव्यात, मुलींच्याही कराव्यात वगैरे... अशा प्रकारचे होते....'सामाजिक मते, त्या काळासाठी प्रगतिशील होती, पण आजसाठी कालबाह्य होत चालली आहेत.' जशी जशी नवी मते पटलीत, तशी त्यांनी मते बदलली सुद्धा. सुरुवातीला विधवाविवाह धर्मबाह्य आहे, असे त्यांचे मत असून, जीवनात पुढे त्यांचा विरोध खूपच कमी झाला. []

[]

व्यक्तिमत्त्व

श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशामधील नोंदीनुसार राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत यांच्या विद्वत्तेविषयीं पुष्कळ लोकांची खात्री होती. तथापि यांनीं विक्षिप्त म्हणून कीर्ति संपादन केली होती, ती स्वतंत्र विचार, लोकांस अप्रिय अशा मतांचें प्रतिपादन, मतांची चंचलता आणि संशोधनाची अपूर्णता इतक्या गुणसमुच्चायामुळें झाली होती, तथापि यांच्या लेखांत महत्त्वाचा भाग पुष्कळ होता.[]

आचार्य भागवतांची कारकीर्द

इस १८७७ सालीं भागवतत्यानीं रॉबर्ट मनी स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. रॉबर्ट मनी स्कूल मधी ते धो. के. कर्वेचें शिक्षक होते. पुढे सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये 'शास्त्री' म्हणून नेमणूक झाली. सेंट झेवियरमध्ये कॉलेजात त्यांची बढती होऊन तेथे शेवटपर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते; इस १८८४ साली 'बॉंबे हायस्कूल' नावांची संस्था निघाली, तिच्या संस्थापकांपैकी ते एक होते; इस १८८६ साली त्यानी 'मराठा हायस्कूल' नावाची एक शाळा काढली व ती थोड्याच वर्षांत लौकिकाला आणली. शेवटची पाचसात वर्षे त्यांना युनिव्हर्सिर्टींत संस्कृतचे परीक्षक नेमले होते. इस १९०२ साली आचार्य भागवत हे विल्सन भाषाअभ्यास (फॉयलॉलॉजिकल) चेअरचे अधिव्याख्याते (लेक्चरर) होते.[] १९०५ च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पूनर् विवाहाचा

पुरस्कार केला होता. जाती वेवस्था आणि अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडु विरोध केला होता.

आचार्य भागवत यांच्याबद्दलचे इतरांचे लेख्न

  • राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक लेख/साहित्य (सहा भाग), संपादिका दुर्गा भागवत
  • राजारामशास्त्री भागवत (चरित्र), लेखिका दुर्गा भागवत
  • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत- एक दर्शन लेखक: रा.ना. चव्हाण. संकलन रमेश रा. चव्हाण

बाह्यदुवे अधिक वाचन

संदर्भ

  1. ^ a b c d e केतकरज्ञानकोश.कॉम संकेतस्थळ लेख,"भागवत, राजाराम (शास्त्री) रामकृष्ण" दिनांक ११ ऑगस्ट २०१३ रोजी भाप्रवे सायंकाळी ४ वाजता जसे अभ्यासले
  2. ^ राजारामशास्त्री भागवत यांचे लेख:लेखक-धनंजय, October 12, 2009 हा उपक्रम संकेतस्थळावरील लेख Archived 2018-04-15 at the Wayback Machine. ११ ऑगस्ट २०१३ भाप्रवे सायं ७ वाजता जसे दिसले