Jump to content

राजा दाहिर

राजा दाहिर सेन तथा राजा दाहिर (सिंधी: راجا ڏاھر‎; इ.स. ६६३ - इ.स. ७१२) हा सिंधचा शेवटचा ब्राह्मण हिंदू राजा होता. पुष्कर्ण राजवंशाच्या या राजाची सत्ता अरबी समुद्रापासून आत्ताच्या पाकिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान, बलोचिस्तान आणि इराण पर्यंत पसरलेले होते.

इ.स. ७१२मध्ये उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिम याने सिंधू नदी काठी आताच्या नवाबशाह या शहराजवळ झालेल्या अरोरच्या लढाईत दाहिरचा पराभव केला. यात दाहिरचा मृत्यू झाला.