राजा ठाकूर
राजा ठाकूर (जन्म : २६ नोव्हेंबर, १९२३; - १९७५) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात कार्यरत होते. त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८), मुंबईचा जावई (१९७०), घरकुल (१९७१) आणि जावई विकत घेणे आहे (१९७२) हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटांसांठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.
कारकीर्द
गोव्यातील फोंडा येथे १९२३ साली ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांनी मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे साहाय्यक म्हणून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात, केली आणि १९६० च्या सुमारास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कथानकांवर आधारित अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले.[१] यानंतर १९७० च्या दशकात दादा कोंडके यांचे विनोदी चित्रपट येऊ लागले, त्याआधीच राजा ठाकुर यांनी 'नवचित्र' या बॅनरखाली तसेच चित्रपट काढले होते.
राजा ठाकुर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- अजब तुझे सरकार
- उतावळा नारद
- एकटी
- गज गौरी
- संत गोरा कुंभार
- घरकुल
- घरचं झालं थोडं
- जखमी हिंदी)
- जावई विकत घेणे आहे
- धनंजय
- पाहू रे किती वाट
- पुत्र व्हावा ऐसा
- बाजीरावचा बेटा
- बिरबल माय ब्रदर (इंग्रजी)
- बोलविता धनी
- माझे घर माझी माणसे
- मी तुळस तुझ्या अंगणी
- मुंबईचा जावई
- रईसजादा हिंदी)
- रंगल्या रात्री अश्या
- राजमान्य राजश्री
- रायगडचा राजबंदी
- रेशमाच्या गाठी
पुरस्कार
- १९५५ - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी)) - मी तुळस तुझ्या अंगणी [२]
- १९६२ - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी)) - रंगल्या रात्री अश्या [३]
- १९६८ - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी)) - एकटी [४]
- १९७० - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी)) - मुंबईचा जावई [५]
- १९७० - महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट चित्रपट) - मुंबईचा जावई [६]
- १९७१ - महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट चित्रपट) - घरकुल [६]
- १९७२ - महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट चित्रपट) - जावई विकत घेणे आहे [६]
संदर्भ
- ^ Pathak, Madhukar (18 April 2010). "रुपेरी प्रतिभेचा राजा!". Maharashtra Times (Marathi भाषेत). 2016-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Ministry of Information and Broadcasting (28 April 1957). "3rd National Film Awards" (PDF). 22 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "10th National Film Awards". International Film Festival of India. 20 April 1963. 22 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "16th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. p. 2. 22 September 2011 रोजी पाहिले.
- ^ "18th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 26 September 2011 रोजी पाहिले.
- ^ a b c K. Moti Gokulsing; Wimal Dissanayake (2013). Routledge Handbook of Indian Cinemas. Routledge. pp. 81–82. ISBN 9781136772849.