राजा (बुद्धिबळ)
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
राजा | ||
राणी | ||
हत्ती | ||
उंट | ||
घोडा | ||
प्यादे |
राजा (♔, ♚) हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे. हा मोहरा कोणत्याही दिशेस (पटावरून बाहेर न जाता) एक घर चाल करून जाऊ शकतो. जर लक्ष्य घरावर शह असेल तर अशा घरात राजा चाल करू शकत नाही.
राजा हे एकमेव मोहरा आहे जो खेळातून बाद होत नाही. जेव्हा राजा वर शत्रूचा शह असताना चाल करण्यासाठी घर नसते तेव्हा मात झाली असे म्हणतात व खेळाडू हरतो. शह नसताना चाल करण्यासाठी घर नसले व इतर कोणत्याही मोहऱ्यास चाल करणे शक्य नसल्यास खेळ बरोबरीत सुटल्याचे जाहीर होते.राजा हा कोणत्याही दिशेने एक घर चालत जाऊ शकतो. जर राजाला धोका निर्माण झाला तर हा खेळ संपुष्टात येतो.. तर हा सर्वस्वी खेळ राजा या वर अवलंबून असतो.