राजस्थानचे पठाण
लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश | |
---|---|
राजस्थान, भारत | |
भाषा | |
राजस्थानी भाषा • इंग्रजी भाषा • उर्दु | |
धर्म | |
![]() | |
संबंधित वांशिक गट | |
Pashtun people |
राजस्थानचे पठाण हा भारतातील राजस्थान राज्यात आढळणारा पठाण/पश्तून समुदाय आहे.[१]
इतिहास आणि मूळ
हा समुदाय पश्तून(पठाण) सैनिक आणि साहसी लोकांचे वंशज आहेत. जे राजस्थानमध्ये विविध राजपूत राजपुत्रांच्या सैन्यात सेवा करण्यासाठी आले होते. टोंकची रियासत १८१७ मध्ये अमीर खान या युसुफझाई पठाणने स्थापन केली होती. त्यावेळेसचे राजपुतानातील एकमेव गैर-हिंदू राज्य होते. या समुदायाला काही वेळा टोंकिया पठाण म्हणून संबोधले जाते. १९४८ मध्ये टोंकचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. १८५७ च्या भारतीय विद्रोहाच्या अपयशामुळे रोहिलखंड प्रदेशातून रोहिला पठाणांचा ओघ देखील येथे आला होता. टोंक व्यतिरिक्त डुंगरपूर, प्रतापगड, बांसवाडा, अजमेर, जयपूर, भरतपूर आणि उदयपूर या जिल्ह्यांतही हे लोक आढळतात. त्यांचे स्वाती, बुनेरी आणि बागोडी असे तीन उपविभाग आहेत. बहुतेक राजस्थानी पठाण युसुफझाई जमातीचे आहेत. त्यांनी फार पूर्वीपासून पश्तो भाषा सोडली आहे आणि आता हिंदुस्थानी तसेच राजस्थानी विविध बोलीभाषा बोलतात.[१]
राजस्थानी पठाणांचा पारंपारिक व्यवसाय राजपुतानातील विविध राज्यांच्या सैन्य दलात सेवा करण्याचा होता. आता अनेकजण राज्य पोलिस, सरकारी लिपिक, तसेच वाहतूक उद्योगात काम करतात. काही जमीन, विशेषतः टोंकमध्ये, आणि शेती करणाऱ्यांचा समुदाय आहे. ते संपूर्णपणे अंतर्विवाहित आहेत, फार क्वचितच समाजाबाहेर विवाह करतात.[१]
प्रत्येक पठाण वस्तीची स्वतःची समुदाय परिषद असते. ज्याला जमात म्हणून ओळखले जाते. पूर्वी जमातचा प्रमुख ऐतिहासिकदृष्ट्या स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठित कुटुंबातून निवडला जात असे. परंतु आता तो निवडणुकेच्या माध्यमाने निवडला जातो. जर एकूणच पठाण समाजाचा प्रश्न असेल तर विविध स्थानिक जमातींचे सदस्य एकत्र येतात. राजस्थानी पठाण संपूर्णपणे सुन्नी आहेत. राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या तबलिघी जमात या सुधारवादी देवबंदी संघटनेच्या प्रभावाने प्रभावित झाले आहेत.[१]
हे सुद्धा पहा
- पश्तून देशांतरित जनसमूह (डायस्पोरा)