Jump to content

राजपूत वर्गीय विनाशिका

भारतीय नौदलासाठी बनविल्या गेलेल्या राजपूत वर्गीय विनाशिका या सोविएत कशीन वर्गीय विनाशिकांचे परिवर्तीत रूप आहे. यांना कशीन वर्ग - २ असेही ओळखले जाते. भारताच्या कशीन आराखड्याच्या विशेष रूपांतरणानंतर या नौका रशियामध्ये बांधल्या गेल्या. मूळ आराखड्यात असलेले हेलिकॉप्टर पॅड,फ्लाइट एलिव्हेटर मध्ये बदलण्यात आले.

राजपूत वर्गीय विनाशिका या भारतीय नौदलातील "ब्राह्मोस" ही स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आलेल्या पहिल्या नौका आहेत. ही प्रणाली या नौकांवर मध्य-कार्यकालीन दुरुस्ती दरम्यान बसवण्यात आली. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कमान आरोही प्रक्षेपकात ८ क्षेपणास्त्र आहेत.[]

नौकांची यादी

नाव क्रमांक बांधणी ठाणे सेवारत सद्यस्थिती
आय.एन.एस. राजपूत D51 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम३० सप्टेंबर १९८० सेवारत
आय.एन.एस. राणा D52 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम२८ जून, १९८२ सेवारत
आय.एन.एस. रणजीत D53 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम२४ नोव्हेंबर १९८३ सेवारत
आय.एन.एस. रणवीर D54 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम२८ ऑक्टोबर, १९८६ सेवारत
आय.एन.एस. रणविजय D55 ६१ कोम्मुनारा जहाजबांधणी कारखाना विशाखापट्टणम१५ जानेवारी, १९८८ सेवारत

संदर्भ आणि नोंदी