राजपुत्र आणि डार्लिंग (कवितासंग्रह)
राजपुत्र आणि डार्लिंग | |
लेखक | ग्रेस |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कवितासंग्रह |
प्रकाशन संस्था | प्रथमावृत्ती अमेय प्रकाशन, नंतर पॉप्युलर प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १९७४ |
चालू आवृत्ती | तिसरी |
माध्यम | मुद्रित |
राजपुत्र आणि डार्लिंग हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा १९७४ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला (अमेय प्रकाशन) काव्यसंग्रह आहे. प्रकाशनक्रमानुसार तो 'संध्याकाळच्या कविता'नंतर दुसरा येतो. प्रकाशनक्रमात चंद्रमाधवीचे प्रदेश हा काव्यसंग्रह तिसरा येत असला तरी राजपुत्र आणि डार्लिंगमधील कवितांचा निर्मितिकाल चंद्रमाधवीचे प्रदेशमध्ये आलेल्या कवितांच्या नंतरचा आहे, असे कवी ग्रेस यांनीच राजपुत्र आणि डार्लिंगमध्ये म्हटलेले आहे.[१] ग्रेस यांचे सर्व ग्रंथ पॉप्युलरच्या पडवीत यावेत यासाठी राजपुत्र आणि डार्लिंगची दुसरी आवृत्ती १९९५ मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने काढली.
अर्पणपत्रिका
जी.ए. कुलकर्णीला,
ज्याने मला मित्र
मानले.
परिचय
या छोटेखानी काव्यसंग्रहात राजपुत्र ही १८ खंडांची कविता, गुलाब वाळवण्याची गोष्ट ही २२ खंडांची कविता आणि डार्लिंग ही २८ खंडांची कविता अशा तीन प्रदीर्घ कविता आणि इतर काही कविता समाविष्ट आहेत. 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेनुसार ग्रेस यांनी 'डार्लिंग' ही कविता १९७२ च्या डिसेंबरात हिवाळा ऐन बहरात असताना लिहिली.
संदर्भ
- ^ Empty citation (सहाय्य).