Jump to content

राज कंवर

राज कंवर
जन्मराज कंवर
इ.स. १९६१
मृत्यू ३ फेब्रुवारी, इ.स. २०१२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषाहिंदी
पत्नी अनिता कंवर
अपत्ये अभय कंवर

राज कंवर ( इ.स. १९६१ - ३ फेब्रुवारी, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते.

बालपण

कारकीर्द

राजकंवर यांनी दिल्ली येथे नाट्य दिग्दर्शनाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या नंतर ते मुंबई मध्ये आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी सुनील हिंगोरानी यांच्या सोबत `राम अवतार’ या चित्रपटासाठी साहाय्यक म्हणून काम केले. तसेच राज कुमार संतोषी यांना घायल साठी दिग्दर्शनात मदत केली. यांनी इ.स. १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेला दिवाना हा पहिला चित्रपट आहे. यातच आघाडीचा अभिनेता शाहरुख खान याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अंदाज या चित्रपट त्यांनी लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा यांना कारकिर्दीला सुरुवात करून दिली.

दिग्दर्शित केलेले चित्रपट

  1. मैड (इ.स. २०१२)
  2. सदियान (इ.स. २०१०)
  3. हमको दिवाना कर गए (इ.स. २००६)
  4. अंदाज (इ.स. २००३)
  5. अब के बरस (इ.स. २००२)
  6. फर्ज (इ.स. २००१)
  7. ढाई अक्षर प्रेम के (इ.स. २०००)
  8. हर दिल जो प्यार करेगा (इ.स. २०००)
  9. बादल (इ.स. २०००)
  10. दाग: द फायर (इ.स. १९९९)
  11. इतिहास (इ.स. १९९७)
  12. जुदाई (इ.स. १९९७)
  13. जीत (इ.स. १९९६)
  14. जान (इ.स. १९९६)
  15. कर्तव्य (इ.स. १९९५)
  16. लाडला (इ.स. १९९४)
  17. दीवाना (इ.स. १९९२)

लेखन केलेले चित्रपट

  1. मॅड (इ.स. २०१२)
  2. अंदाज (इ.स. २००३)
  3. अब के बरस (इ.स. २००२)
  4. धाई अक्षर प्रेम के (इ.स. २०००)
  5. बादल (इ.स. २०००)
  6. दाग: द फायर (इ.स. १९९९)
  7. इतिहास (इ.स. १९९७)
  8. जीत (इ.स. १९९६)

निर्मिती केलेले चित्रपट

  1. मॅड (इ.स. २०१२)
  2. सदियान (इ.स. २०१०)
  3. अक़ीब (इ.स. २००७)
  4. हमको दिवाना कर गए (इ.स. २००६)
  5. अब के बरस (इ.स. २००२)
  6. धाई अक्षर प्रेम के (इ.स. २०००)
  7. दाग: द फायर (इ.स. १९९९)
  8. इतिहास (इ.स. १९९७)

सह दिग्दर्शन केलेले चित्रपट

  1. घायल (इ. स.१९९०)
  2. राम -अवतार (इ. स.१९८८)

वैयक्तिक जीवन

त्यांचे अनिता कंवर यांच्याशी लग्न झाले असून अभय नावाचा मुलगा आहे.

राज कंवर किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापुरला गेले होते पण त्या आधीच राज कंवर यांचे सिंगापूरमध्ये ३ फेब्रुवारी, इ.स.२०१२ रोजी निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. मृत्युपूर्वी काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.

बाह्य दुवे

संदर्भ

राज कंवर यांची कारकीर्द

en:Raj Kanwar