Jump to content

राघवेंद्र गदगकर

राघवेंद्र गदगकर (जन्म : कानपूर, जून २८, इ.स. १९५३ - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आणि कीटकतज्ज्ञ आहेत. गदगकर हे बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत.

संशोधन

कीटकांचे सामूहिक वर्तन हे त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र आहे. त्या विषयात त्यांनी रोपालिडिया मार्गिनाटा या गांधीलमाशीच्या स्थानिक प्रजातीवर संशोधन केले आहे.

कीटक समूहाने का राहतात, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यामुळे काय फायदे होतात, मधमाश्यांमध्ये राणीमाशी कशी ठरते यांवर त्यांनी संशोधन केलेले आहे.

कीटकांच्या वर्तनाबाबत डब्ल्यू.डी. हॅमिल्टन यांनी १९६४ मध्ये जे संशोधन केले ते गदगकर यांनी पुढे नेले आहे. कीटकांच्या अभ्यासासाठी त्यांनी तीन दशकांपासून सक्रिय संशोधन गटही स्थापन केला असून कीटकांच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्‍न केला आहे.

सेंटर फॉर कॉंटेंपररी स्टडीज

गदगकरांनी बंगलोरला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत, सेंटर फॉर कॉंटेंपररी स्टडीज नावाचे अभ्यासकेंद्र स्थापन केले आहे. तेथे कवी संवाद कसा साधतात, सध्याचे प्रश्न इतिहासातून कसे सोडवता येतील, वैज्ञानिकही कवीच्या भाषेत संवाद साधू शकतील का, अशा कल्पनांवर आधारित शिक्षण दिले जाते.

पुस्तके

  • सामाजिक जीवशास्त्र व कीटकांचे वर्तन या विषयातील नवीन संशोधनाची माहिती देणारे ’सव्‍‌र्हायव्हल स्ट्रॅटेजीज’ हे पुस्तक.
  • द सोशल बायॉलॉजी ऑफ रोपालिडिया मार्गिनाटा - टोअर्ड्‌स अंडरस्टॅन्डिंग द इव्होल्युशन ऑफ सोशॅलिटी

सन्मान आणि पुरस्कार

त्यांच्या जगावेगळ्या संशोधनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-

  • जर्मनीने त्यांना काही संस्थांचे सदस्यत्व दिले आहे.
  • जर्मनीने दिलेला क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ द मेरिट हा मानाचा नागरी सनमान.
  • इ.स. २००६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते परदेशी सदस्य म्हणून निवडले गेले.
  • १९९३ मध्ये त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आले