राग भूप
राग भूप हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
| ||||
---|---|---|---|---|
थाट | कल्याण | |||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | औडव-औडव | |||
स्वर | मध्यम व निषाद वर्ज्य | |||
आरोह | सा रे ग प ध सा | |||
अवरोह | सा ध प ग रे सा | |||
वादी स्वर | गंधार | |||
संवादी स्वर | धैवत | |||
पकड | साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, सारेग पऽ धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग सा | |||
गायन समय | रात्रीचा पहिला प्रहर | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | राग देसकार | |||
उदाहरण | ||||
इतर वैशिष्ट्ये | {{{इतर वैशिष्ट्ये}}} |
हा राग कल्याण थाटाचा राग आहे. या रागामध्ये ‘मध्यम‘ व ‘निषाद‘ हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर ‘गंधार‘ असून संवादी स्वर ‘धैवत‘ आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गातात. या रागाला समप्रकृती असा देसकार हा राग आहे. हा भक्तिरसप्रधान राग आहे.
आरोहः- सा रे ग प ध सा । अवरोहः- सा ध प ग रे सा ।
पकड- साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ ग, धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग धऽ धऽ सा ।
भूप/भूपाळी रागात बांधलेली गीते :-
- घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला (चित्रपट - अमर भूपाळी)
- देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा (चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गांवा)
- माझे जीवन गाणे (भावगीत)
- शरयू तीरावरी अयोध्या (गीतरामायण)
- सुजन कसा मन चोरी (नाटक - स्वयंवर)