Jump to content

राग जोगिया

राग जोगिया हिंंदुस्तानी शास्रीय संंगीतातील एक राग आहे.

थाट

या रागाचा थाट भैरव हा आहे.

स्वरूप

या रागात रिषभ, कोमल धैवत आणि उरलेले स्वर शूद्ध आहेत.आरोहात गंंधार निषाद आणि अवरोहात केवळ गंंधार वर्ज्य आहे. या रागाची जाती ओडव षाडव अशी असून वादी स्वर मध्यम आणि संंवादी स्वर षड्ज आहे.

गानसमय

या रागाचा गानसमय दिवसाचा पहिला प्रहर हा आहे.[]

या रागातील प्रसिद्ध गीते

  • गीत रामायणातील 'मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?' हे लता मंगेशकर ह्यांनी गायलेले गाणे मिश्र जोगिया रागात होते. (गीताचे कवी गदिमा आणि संगीकार सुधीर फडके.)

संदर्भ

  1. ^ डाॅॅ.गर्ग लक्ष्मीनारायण,संंगीत विशारद,१९९४,पृृष्ठ २८६