Jump to content

राग जोगकंस

राग जोगकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

जोगकंस हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग असून आसावरी थाटात ह्याची मांडणी केलेली आहे. 'गुणिदास' उर्फ जगन्नाथबुवा पुरोहित ह्या रागाचे जनक म्हणून ओळखले जातात. राग जोग आणि 'कौंस' अंगाच्या स्वरावलींचा मिलाफ म्हणून हा राग प्रचलित आहे.

मालकंसावर आधारित राग रचण्याचा जगन्नाथबुवांचा मानस होता. मात्र ह्या रागात शुद्ध निषादाला वरचढ ठरवून मालकंसातला कोमल निषाद आटोपता ठेवला. म्हणूनच चंद्रकौंसाशी ह्या रागाचे साधर्म्य जाणवते.