राग जोग
हा लेख भारतीय शास्त्रीय संगीतातील राग जोग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जोग (आडनाव).
राग जोग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
| ||||
---|---|---|---|---|
थाट | काफी | |||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | औडव औडव | |||
स्वर | ||||
आरोह | नि सा ग म प नि' सां | |||
अवरोह | सां नि' प म ग सा ग' सा | |||
वादी स्वर | म | |||
संवादी स्वर | सा | |||
पकड | ||||
गायन समय | मध्यरात्र | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | ||||
उदाहरण | जीर्ण पाचोळा पडे तो उदास भावगीत, कवि - कुसुमाग्रज गायिका - लता मंगेशकर संगीतकार - वसंत प्रभू | |||
इतर वैशिष्ट्ये | (वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत ) |
रागाची रचना
या रागात 'रे' व 'ध' वर्ज्य असून दोन्ही गचा उपयोग केला जातो. आरोहात शुद्ध ग तर अवरोहात दोन्ही ग वापरले जातात.
रागाची वेळ
हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो.
जोग रागातील काही गीते
उनपे युं प्यार आने लगा है (गझल - गुलाम अली)
जीर्ण पाचोळा पडे तो उदास (भावगीत, कवि - कुसुमाग्रज; गायिका - लता मंगेशकर; संगीतकार - वसंत प्रभू)
त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग ( कवि - आत्माराम सावंत; गायिका - माणिक वर्मा; संगीत -दशरथ पुजारी)
नैन द्वार से मनमें (चित्रपट - सावन; संगीत - हंसराज बेहेल; गायक-गायिका - मुकेश, लता मंगेशकर)
सासुरास चालली लाडकी शकुंतला ( चित्रपट -सुवासिनी, गीत - ग. दि. माडगुळकर; गायक व संगीत - सुधीर फडके)