राग चंद्रकंस
| ||||
---|---|---|---|---|
थाट | काफी | |||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | औडव औडव | |||
स्वर | ||||
आरोह | सा ग' म ध' नि सां | |||
अवरोह | सां नि ध' म ग' सा | |||
वादी स्वर | म | |||
संवादी स्वर | सा | |||
पकड | ||||
गायन समय | मध्यरात्र | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | ||||
उदाहरण | या डोळ्यांची दोन पाखरं चित्रपट - पाठलाग गायिका आशा भोसले संगीतकार - दत्ता डावजेकर | |||
इतर वैशिष्ट्ये | (वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत ) |
राग चंद्रकंस हा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते.[१] मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो.
आधारित गाणी
या रागावर आधारित मराठीतील गाणी :
- "विठ्ठला देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ।"
- बोलले इतुके मज श्रीराम (गीत रामायण कवि ग दि माडगुळकर, संगीत -सुधीर फडके)
- जेथे जातो तेथे तू माझा सांगाती (अभंग तुकयाचे, संगीत श्रीनिवास खळे , गायिका लता मंगेशकर )
- आठवणी दाटतात (गीत योगेश्वर अभ्यंकर, संगीत एम जी गोखले, गायिका सुमती टिकेकर )
संदर्भ
- ^ नादवेध- सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. 2013. p. 180. ISBN 81-7434-332-6.