Jump to content

राक्षसी वायू ग्रह


राक्षसी वायू ग्रह हे मुख्यतः हायड्रोजनहेलियम पासून बनलेले महाकाय ग्रह असतात. गुरूशनी हे सूर्यमालेतील राक्षसी वायू ग्रह आहेत. पूर्वी "महाकाय ग्रह" आणि "राक्षसी वायू ग्रह" या संज्ञा समानार्थी होत्या. सन १९९० मध्ये युरेनस आणि नेपच्यून हे एका वेगळ्या वर्गातील ग्रह असल्याचे दिसून आले. हे ग्रह जड वायुरूपप्रवण पदार्थांपासून बनलेले होते. कालांतराने त्यांना बर्फाळ राक्षसी ग्रह म्हणून ओळखले जावू लागले.