रसिका सुनील
रसिका सुनील | |
---|---|
जन्म | रसिका धबडगांवकर ८ मार्च, १९९२ अकोला, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१६ ते आजतागायत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझ्या नवऱ्याची बायको |
पुरस्कार | झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार |
वडील | सुनील धबडगांवकर |
पती | आदित्य बिलागी (ल. २०२१) |
रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र)[१] ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.[२]
मागील जीवन आणि शिक्षण
रसिकाचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. रसिकाने बेडेकर कॉलेज येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. बालपणी तिने नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता.
चित्रपट
- पोश्टर गर्ल[३]
- बघतोस काय मुजरा कर
- बस स्टॉप
- गॅटमॅट
- गर्लफ्रेंड
मालिका
- माझ्या नवऱ्याची बायको (शनाया)[४]
(२२ ऑगस्ट २०१६ ते ०१ सप्टेंबर २०१८, १३ जुलै २०२० ते ०२ जानेवारी २०२१ आणि ४ ते ७ मार्च २०२१)
नाटक
- डाएट लग्न (ऋता)
बाह्य दुवे
रसिका सुनिल आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "रसिका सुनीलचा वाढदिवस". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-08-03. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?". Lokmat. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "रसिका पोश्टर गर्ल मध्ये थिरकली लावणीच्या तालावर". MegaMarathi.Com (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनाया' घेणार 'एग्झिट'? | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.[permanent dead link]