Jump to content

रश्मी उर्ध्वरेषे

रश्मी उर्ध्वरेषे
जन्म रश्मी रानडे
१९५९
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
नागरिकत्वभारत भारतीय
शिक्षण वाहन अभियंता
प्रशिक्षणसंस्था विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, महाराष्ट्र
पदवी हुद्दा संचालक
संचालकमंडळाचे सभासद ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार

रश्मी उर्ध्वरेषे उर्फ रश्मी रानडे (जन्म १९५९) या एक भारतीय वाहन अभियंता आहेत. इ.स. २०१४ पासून त्या 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या संचालिका आहेत. वाहन क्षेत्रातील अतुलनीय कामामुळे मार्च २०२० मध्ये उर्ध्वरेषे यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[]

वैयक्तिक आयुष्य

रश्मी उर्ध्वरेषे यांचा जन्म इ.स. १९५९ मध्ये नागपूर शहरात झाला.[] इस १९७७ मध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर मधून विद्युत अभियांत्रिकीचे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून वाहन अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी भारतात या क्षेत्रात महिलांनी आपले शैक्षणिक कारकीर्द निवडणे ही एक असामान्य आणि तेव्हढीच आवाहनात्मक बाब होती. त्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालयात अगदी मोजक्याच महिला शिक्षण घेत असत आणि त्यातही वाहन क्षेत्रात तर सामान्यतः पुरुषांचीच मक्तेदारी होती.[]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रश्मी उर्ध्वरेषे यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना, सोबत मंत्री स्मृती इराणी

नंतर उर्ध्वरेषे यांनी शापन्विकी अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले आणि जलविद्युत (हायड्रॉलिक्स) आणि उत्सर्जन नियंत्रणासाठीच्या चाचणी मशीनचे नियंत्रण विकसित करण्याचे काम केले. त्यांनी उत्सर्जन मोजण्याच्या पद्धती विकसित करण्यास मोलाची मदत केली आणि त्याकाळी ती उत्सर्जनाचा अभ्यास करणारी पहिली भारतीय प्रयोगशाळा होती. उर्ध्वरेषे यांचे कौशल्याचे क्षेत्रे 'ऑटोमोटिव्ह सेफ्टी', 'एमिशन आणि एम्बियंट एर क्वालिटी' ( एक्यूएम ), 'ई-मोबिलिटी', 'शाश्वत वाहतूक', 'वाहन नियमन', 'एकरूपता' इत्यादी आहेत. त्या 'एकूण गुणवत्ता व्यवस्थापनात' तज्ज्ञ होत्या आणि त्यांनी या विषयावर एक पुस्तक पण लिहिले.[]

छंद आणि आवड म्हणून त्या सतार वाजवायला शिकल्या आणि कालांतराने त्या राज्यस्तरीय ब्रिजमध्ये विजेती ठरल्या.[]

नंतर इ.स. २०१४ मध्ये 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पुढील संचालिका म्हणून त्यांची निवड झाली.[]

इ.स. २०१९ पर्यंत त्यांनी जे पस्तीस वर्षात वाहन संशोधन आणि विकास क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले त्यानिमित्ताने त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार मार्च २०२० मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार महिला सक्षमीकरणासाठी अपवादात्मकपणे काम करणाऱ्या महिलांना दिला जातो. रश्मी उर्ध्वरेषे या SAE India (वाहन अभियांत्रिकी साठीची आंतरराष्ट्रीय संस्था)च्या भावी अध्यक्षा आहेत.[][]

वैवाहिक जीवन

रश्मी उर्ध्वरेषे यांचे पती हेमंत उर्ध्वरेषे हे सुद्धा अभियंता आहेत. रश्मी सहा महिने जर्मनीत असताना त्यांनी आपल्या चौदा महिन्यांच्या मुलाची (सारंग उर्ध्वरेषेची) स्वतः काळजी घेतली होती.[]

संदर्भ

  1. ^ a b c www.ETAuto.com. "Educating girls will bring significant changes in society: Rashmi Urdhwardeshe, ARAI Director - ET Auto". ETAuto.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "36 years' efforts reached its zenith today: Nari Shakti award winner Rashmi Urdhwardeshe". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-08. 2021-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Women of Mettle – Rashmi Urdhwareshe, Director, ARAI". motorindiaonline.in. 2020-07-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Educating Girls Will Bring Significant Changes In Society: Rashmi Urdhwardeshe". BW Education (इंग्रजी भाषेत). 2021-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-04 रोजी पाहिले.