रशियाचे प्रजासत्ताक
रशिया देश एकूण ८३ प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला असून त्यांपैकी २१ प्रजासत्ताके आहेत. प्रत्येक प्रजासत्ताकामध्ये रशियनेतर स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहेत. प्रजासत्ताकांना आपापली राजकीय भाषा ठरवण्याचा तसेच इतर अनेक स्वायत्ततेचे हक्क दिले गेले आहेत.
सध्या अनेक प्रजासत्ताकांमध्ये फुटीरवादी चळवळी सुरू आहेत. चेचन्या व इतर कॉकाससमधील प्रजासत्ताकांमध्ये ह्यावरून अनेक लढाया देखील झाल्या आहेत.
नकाशा
1. अदिगेया 2. आल्ताय 3. बाश्कोर्तोस्तान 4. बुर्यातिया 5. दागिस्तान 6. इंगुशेतिया | 7. काबार्डिनो-बाल्कारिया 8. काल्मिकिया 9. काराचाय-चेर्केस 10. कॅरेलिया 11. कोमी 12. मारी एल | 13. मोर्दोविया 14. साखा 15. उत्तर ओसेशिया-अलानिया 16. तातरस्तान 17. तुवा 18. उद्मुर्तिया | 19. खाकाशिया 20. चेचन्या 21. चुवाशिया |