Jump to content

रशियाचा दुसरा निकोलस

दुसरा निकोलाय
झार
दुसरा निकोलाय
अधिकारकाळ२० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७
राज्याभिषेक१४ मे, इ.स. १८९६
पूर्ण नावनिकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह
जन्म६ मे, इ.स. १८६८
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू१७ जुलै, इ.स. १९१८
येकातेरीनबर्ग, सोव्हिएत संघ
पूर्वाधिकारीअलेकझांडर तिसरा
वडीलअलेकझांडर तिसरा
आईमारिया फेडोरोव्हना
पत्नीहेसेची अलेक्झांड्रा
राजघराणेरोमानोव्ह

दुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियन राजांप्रमाणे त्याला झार (जरी रशियाने झारवाद १७२१ला बंद केला होता) पद प्राप्त झाले. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसऱ्या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.