रशियाचा तिसरा पीटर
तिसरा प्योत्र (रशियन: Пётр III Фёдорович, तिसरा प्योत्र फ्योदोरोविच;) (फेब्रुवारी २१, इ.स. १७२८ - जुलै १७, इ.स. १७६२) हा इ.स. १७६२ साली सहा महिने रशियाच्या झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो प्रशियाधार्जिणा व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसऱ्या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी दुसरी येकातेरिना हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.
बाह्य दुवे
- तिसरा प्योत्र फ्योदोरोविच याचे चरित्र (रशियन मजकूर)