रवीना टंडन
रवीना टंडन | |
---|---|
जन्म | २६ ऑक्टोबर, १९७४ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पती | अनिल थाडनी (ल. २००४) |
रवीना टंडन (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत. १९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. परंतु २००१ सालच्या दमन ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच मधुर भांडारकरच्या २००३ मधील सत्ता ह्या चित्रपटामधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रवीना टंडन चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत