Jump to content

रवींद्र नारायण रवी

श्री. रवींद्र नारायण रवी

विद्यमान
पदग्रहण
१८ सप्टेंबर २०२१
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन
मागील बनवारीलाल पुरोहित

कार्यकाळ
१ ऑगस्ट २०१९ – १७ सप्टेंबर २०२१
मागील पद्मनाभ आचार्य
पुढील जगदीश मुखी (अतिरिक्त प्रभार)

मेघालयचे राज्यपाल (अतिरिक्त प्रभार)
कार्यकाळ
१८ डिसेंबर २०१९ – २६ जानेवारी २०२०
मागील तथागत रॉय
पुढील तथागत रॉय

भारताचे उप - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
कार्यकाळ
५ ऑक्टोबर २०१८ – ३१ जुलै २०१९

भारत-नागा शांतता चर्चेचे संवादक
कार्यकाळ
सप्टेंबर २०१४ – सप्टेंबर २०२१
मागील कार्यालय स्थापन केले
पुढील कार्यालय रद्द केले

जन्म ३ एप्रिल, १९५२ (1952-04-03) (वय: ७२)
पाटणा, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
पत्नी लक्ष्मी रवी
धर्म हिंदू

रवींद्र नारायण रवी (जन्म ३ एप्रिल १९५२) हे तामिळनाडूचे वर्तमान आणि १ वे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आणि माजी सरकारी अधिकारी आहेत. त्यांनी १ ऑगस्ट २०१९ ते ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत नागालँडचे १८ वे राज्यपाल म्हणून काम केले आहे.[]

कारकीर्द

रवींद्र नारायण रवी यांचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला १९७४ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. पत्रकारितेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत १९७६ मध्ये रुजू झाले आणि केरळ राज्यात त्याची नेमणूक करण्यात आली. त्यांनी केरळमध्ये जिल्ह्यांसह विविध पदांवर आणि नंतर देशाच्या विविध भागात विविध पदांवर काम केले.

त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), गुप्तचर विभाग (IB) यामध्ये विविध पदांवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी वांशिक बंडखोरींनी प्रभावित भागात संघर्ष निराकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि अनेक सशस्त्र बंडखोर गटांना शांततेत आणले आहे.

२०१२ मध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय दैनिकांमध्ये नियमित स्तंभलेखन केले.

पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, जिथे गुप्तचर समुदायाचे प्रमुख म्हणून त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी समितींना समन्वय आणि मार्गदर्शन केले.

ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांची नागा शांतता चर्चेसाठी केंद्राचे संवादक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांची उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यांनी १ ऑगस्ट २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत नागालँडचे राज्यपाल म्हणून काम केले. भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी त्यांची तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे आणि १८ सप्टेंबर २०२१ रोजी तामिळनाडूचे १५ वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Nagaland Governor R.N. Ravi shifted to Tamil Nadu; Banwarilal Purohit moved to Punjab" (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. New Delhi. 2021-09-09. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
  2. ^ "माननीय राज्यपालांचे व्यक्तिचित्र" (PDF).