Jump to content

रवींद्र आंबेकर

रवींद्र आंबेकर हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सध्या ते मॅक्समहाराष्ट्र या लोकप्रिय पोर्टलचे संस्थापक-संपादक म्हणून काम पाहत आहेत. रवींद्र आंबेकर यांनी प्रिंट पत्रकारितेत नवशक्ती, लोकमत, वृत्तमानस असा वृत्तपत्रांत काम केल्यानंतर ई टीव्ही पासून आपल्या टीव्ही पत्रकारितेची सुरुवात केली. ई टीव्ही, आईबीएन7, जय महाराष्ट्र, मी मराठी अशा वृत्तवाहिन्यांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम केल्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांनी पर्यायी माध्यमांमध्ये पत्रकारितेची सुरुवात केली.

आजवर त्यांनी अनेक पत्रकारांना प्रशिक्षण दिले असून, नव पत्रकारांना ते सतत मार्गदर्शन करत असतात.

रवींद्र आंबेकर हे महाराष्ट्रातील पत्रकार आहेत. ते आयबीएन ७ या हिंदी भाषिक वृत्तवाहिनीमध्ये ब्यूरोप्रमुखपदावर काम करत आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांच्या 'टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशन' या एकमेव संघंटनेच्या [ संदर्भ हवा ] अध्यक्षपदाची सूत्रे सलग दुसऱ्यांदा सांभाळत आहेत.

सामाजिक क्षेत्रातील योगदान

रवींद्र आंबेकर यांनी टीव्ही पत्रकारितेत ग्रामीण भागातील बातम्यांना विशेष महत्त्व देण्याचे प्रयत्न केले आहेत. रवींद्र आंबेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत खेड्यापाड्यांतील बातम्यांना राष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले [ संदर्भ हवा ]. लहान मुलांना मंदिराच्या कळसावरून खाली फेकण्याची अघोरी प्रथा, सांगलीतील स्पृश्यास्पृश्य भेदातून दलितांना मंदिरप्रवेश बंदीचे प्रकरण व लातूर भागातील शाळांमध्ये गुणवाढीचे स्टिंग ऑपरेशन इत्यादी प्रकरणांच्या बातम्या आंबेकरांनी पुढे आणल्या. आंबेकर यांनी राष्ट्रसेवा दल, छात्रभारती या संघटनांमार्फत विद्यार्थी चळवळींत काम केले. नर्मदा बचाओ आंदोलन, बचपन बचाओ आंदोलन या आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन

महाराष्ट्रातील वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या टीव्ही पत्रकारांच्या संघटनेचे रवींद्र आंबेकरांनी सलग दोनदा अध्यक्षपद भूषवले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत कडक कायदा करण्यासाठी त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात लढा दिला. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या लढ्यानंतर महाराष्ट्र शासनाने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याविषयी विधेयक मांडण्यासाठी एक समिती स्थापली. तसेच तीन महिन्यांच्या आत कायदा करण्यासंदर्भात सरकारने घोषणा केली [ संदर्भ हवा ].