रमेश सिप्पी
रमेश सिप्पी | |
---|---|
जन्म | २३ जानेवारी, १९४७ कराची, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार |
पत्नी | किरण जुनेजा |
अपत्ये | रोहन सिप्पी |
रमेश सिप्पी (सिंधी: رمیش سپی; २३ जानेवारी १९४७) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आहे. शोले ह्या बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी व सर्वात लोकप्रिय चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तो प्रामुख्याने ओळखला जातो. शोलेखेरीज त्याने सीता और गीता, शान, सागर इत्यादी अनेक हिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले. रमेश सिप्पीला भारत सरकारने २०१३ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवले.
रमेश सिप्पीने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांची यादी
- अंदाज (१९७१)
- सीता और गीता (१९७३)
- शोले (१९७५)
- शान (१९८०)
- शक्ति (१९८२)
- सागर (१९८५)
- जमीन (१९८७)
- बुनियाद (दूरदर्शनवरील धारावाहिक मालिका)
- भ्रष्टाचार (१९८९)
- अकेला (१९९१)
- जमाना दीवाना (१९९५)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रमेश सिप्पी चे पान (इंग्लिश मजकूर)