Jump to content

रमेश भाटकर

रमेश भाटकर
जन्म ३ ऑगस्ट १९४९
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ४ फेब्रुवारी २०१९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटके अश्रूंची झाली फुले
प्रमुख चित्रपटमाहेरची साडी
प्रमुख टीव्ही कार्यक्रममाझे पती सौभाग्यवती
पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार
वडील वासुदेव भाटकर
पत्नी मृदुला भाटकर

रमेश भाटकर (जन्म : ३ ऑगस्ट १९४९; - ४ फेब्रुवारी २०१९) हे एक नावाजलेले मराठी अभिनेते होते. गायक - संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत विविधांगी अभिनय केला होता.

व्यक्तिमत्त्व

अतिशय उमद्या आणि खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या [] रमेश भाटकर ह्यांनी अभिनयासोबत जलतरणातही विशेष प्रावीण्य कमावले होते. तसेच ते उत्कृष्ट खो-खो पटू होते. [] आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास तीसहून अधिक मालिकांमध्ये आणि ५०हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला.

९८व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. []

रमेश भाटकर ह्यांच्या गाजलेल्या कलाकृती पुढीलप्रमाणे []

दूरचित्रवाणी मालिका

नाटके

  • अखेर तू येशीलच
  • अश्रूंची झाली फूले
  • केव्हा तरी पहाटे
  • मुक्ता
  • राहू केतू

चित्रपट

  • अष्टविनायक
  • आपली माणसं
  • चांदोबा चांदोबा भागलास का
  • दुनिया करी सलाम
  • माहेरची साडी

मृत्यू

ते कर्करोगाचे रुग्ण होते. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे एलिझाबेथ रुग्णालयात त्यांची जीवनज्योत मालवली. त्यावेळी ते ७० वर्षांचे होते.

संदर्भ

  1. ^ नहीं रहे चर्चित मराठी अभिनेता रमेश भाटकर https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/marathi-actor-ramesh-bhatkar-is-no-more/articleshow/67835121.cms
  2. ^ ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन http://www.saamana.com/veteran-actor-ramesh-bhatkar-passes-away/ Archived 2019-02-07 at the Wayback Machine.
  3. ^ रमेश भाटकर यांचे निधन https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/ramesh-bhatkar-passes-away/articleshow/67839660.cms[permanent dead link]
  4. ^ World Cancer Dayच्या दिवशीच रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-actor-ramesh-bhatkar-passes-away-1835086/