रमेश धोंगडे
डॉ. रमेश वामन धोंगडे (जन्म : इ.स. १९४३) एक भाषाविज्ञानाचे अभ्यासक आहेत.[ संदर्भ हवा ]
शिक्षण
धोंगडे हे इंग्रजीत एम.ए. आणि भाषाविज्ञानशास्त्रातले पीएच.डी. आहेत.[ संदर्भ हवा ]
कारकीर्द
धोंगडे हे डेक्कन महाविद्यालयात इ.स. १९६५ ते १९७८ या काळात इंग्रजीचे प्राध्यापक होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबई येथे उपयोजित भाषाविज्ञान (अप्लाइड लिंग्विस्टिक्स) हा विषय शिकवला. डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ (१९८० - २००३) येथे त्यांनी भाषाविज्ञान विषय शिकवला आणि भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख असताना २००३ साली ते निवृत्त झाले.[ संदर्भ हवा ] ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अभ्यागत प्राध्यापक होते.[ संदर्भ हवा ] (२०१३-२०१६) या काळात त्यांनी मराठी भाषेच्या मालवणी आणि आगरी बोलीभाषांचे सर्वेक्षण केले.[ संदर्भ हवा ] सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे येथे त्यांनी सल्लागार आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून देखील काम केले आहे.[ संदर्भ हवा ] आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]
लिहिलेली पुस्तके
रमेश धोंगडे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
- अर्वाचीन मराठी[१]
- आत्मलक्षी समीक्षा[२]
- इंग्रजी - मराठी शब्दकोश
- तेंडुलकरांची नाटके: पाठ्य व प्रयोग
- दलित आत्मचरित्रे: साहित्य आणि समाज[३]
- भाषा आणि भाषाविज्ञान
- मराठी भाषा आणि शैली[४]
- शैलीवैज्ञानिक समीक्षा
- शतकाची विचारशैली[५]
- सामाजिक भाषाविज्ञान (२००६)[६]
संदर्भ
- ^ Indāpūrakara, Candrakānta Dattātraya (1989). Marāṭhī bhāshā: vyavasthā āṇi adhyāpana. Kônṭineṇṭala Prakāśana.
- ^ "http://www.unipune.ac.in/Syllabi_PDF/old_sylabus/ma/ma_marathi_I.pdf" (PDF). ४ मे २०२० रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ Dhoṅgaḍe, Rameśa (1992). Dalita ātmacaritre, sāhitya āṇi samāja. Madhurāja Pablikeśansa.
- ^ Dhoṅgaḍe, Rameśa (1991). Marāṭhī bhāshā āṇi śailī. Dilīparāja Prakāśana.
- ^ Śatakācī vicāra-śailī: Akhila Bhāratīya Marāṭhī Sāhitya Sammelanātīla adhyakshyīya bhāshaṇe va tyañcī cikitsā. Dilīparāja Prakāśana. 2002.
- ^ Dhongde, R. V. (Ramesh Vaman), 1943- (2006). Sāmājika bhāshāvijñāna : vaicārika, samikshātmaka (Prathamāvr̥ttī ed.). Puṇe: Dilīparāja Prakāśana. ISBN 81-7294-514-0. OCLC 309736815.CS1 maint: multiple names: authors list (link)