Jump to content

रमेश गर्जे


रमेश गर्जे
जन्मकोल्हार कोल्हुबाईचे, पाथर्डी तालुका, अहमदनगर जिल्हा
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए., एम.बी.ए.
प्रशिक्षणसंस्था पुणे विद्यापीठ
पेशा भारतीय पोलिस सेना (भा.पो.से.)
कारकिर्दीचा काळ २०११
मूळ गावकोल्हारकोल्हुबाईचे
पदवी हुद्दासहायक पोलीस निरीक्षक
धर्महिंदू धर्म
पुरस्कार विशेष सेवा पदक (२०१९)


रमेश गर्जे हे कोल्हार, पाथर्डी तालुका, अहमदनगर जिल्हा - हया हे महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी आहेत. ते सध्या (२०१९ साली) सहायक पोलीस निरीक्षक. [[नक्षलग्रस्त भागात आहेत. यांना नक्षलग्रस्त भागात २ वर्षे खडतर आणि विशेष सेवा बजाविल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक यांचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या पदकास ‘खडतर सेवा पदक’ असेही म्हणतात. रमेश गर्जे हे सन २०११ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आले होते. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ५ वर्षे सातारा जिल्ह्यात काम केले. ३ वर्षे कराड आणि त्यानंतर २ वर्षे स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे अनेक गाजलेल्या गुन्ह्यांचा तपास केला. विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे काम करताना राज्यात गाजलेल्या वाई हत्याकांडाचा त्यांनी छडा लावला. त्याबद्दल १ मे २०१९ रोजी त्यांना पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले. सध्या ते स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. विशेष सेवा बदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.