Jump to content

रमणी गभरु

रहमत बानू बेगम
जन्म रमणी गभरु
c. १६५६
आसाम, भारत
जोडीदार महंमद आझम शाह
Houseआहोम साम्राज्य (जन्माने)
तैमुरीड राजवंश (लग्नाने)
वडील जयध्वज सिंह
आई पखोरी गभरु

रमणी गभरु (रहमत बानू बेगम ; जन्म c. १६५६) ह्या आसाम राज्याची राजकुमारी आणि मुगल सम्राट मुहम्मद आझम शाह यांची पहिली पत्नी होती. तिला घिलाझारीघाटाच्या कराराचा भाग म्हणून मुघल हरमला पाठवण्यात आले होते.

अहोम साम्राज्याचा राजा चाओफा सुतम्ला आणि त्याची पत्नी पखोरी गभरु, मोमाई तमुली बोरबरुआ यांची मुलगी, या दोघांची ती एकुलती एक मुलगी होती. ती लचित बोरफुकन आणि लालुकसोला बोरफुकन यांची भाची होती. तिने गुवाहाटीला तिच्या पतीकडे सोपवण्याच्या लालुकसोला बोरफुकनच्या योजनेला उघडपणे विरोध केला होता.

प्रारंभिक जीवन

रमणी गभरु यांचा जन्म अहोम राजकुमारी म्हणून झाला होता, आणि अहोम राजवंशाचा राजा स्वर्गदेव जयध्वज सिंह आणि त्यांची पत्नी पखोरी गभारू, तमुली कुवारी यांची एकुलती एक मुलगी होती. [] तिचे जन्माचे नाव रमणी गभरु होते. तसेच तिला नांगचेन गभरु आणि मैना गभरु म्हणूनही ओळखले जात होते. []

ती मोमाई तमुली बोरबरुआ यांची नात होती. मोमाई तमुली बोरबरुआ ह्या अहोम राज्याच्या एक सक्षम प्रशासक आणि सरसेनापती होत्या. रमणी गभरु या लचित बोरफुकन आणि लालुकसोला बोरफुकन यांची भाची होत्या. [] या दोघांना त्यांच्या सराईघाटातीला लढाई सहभागाबद्दल ओळखले जाते. त्यांनी रामसिंह पहिलाच्या आदेशानुसार परत जाण्याऱ्या मुघल सैन्यावर हल्ला केला होता. .

लग्न

जेव्हा मीर जुमलाने जयध्वजच्या राज्यावर आक्रमण केले आणि युद्धात त्याचा पराभव केला, तेव्हा त्याने मीर जुमलाबरोबर एका अटीवर युद्धविराम केला. या अंतर्गत त्यांची मुलगी रमणी गभरुला फक्त सहा वर्षांची असताना मुघलांच्या शाही हारमला पाठवावे लागले [] तिच्या वडिलांना १५ जानेवारी १६६३ रोजी औरंगजेबाच्या दरबारात युद्ध नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या मुलीला पाठवणे बंधनकारक होते. [] इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिला रहमत बानू बेगम हे मुस्लिम नाव देण्यात आले आणि शाही हेरममध्ये वाढवण्यात आले. [] पाच वर्षांनंतर, तिचा विवाह औरंगजेबाचा मुलगा महंमद आझम शाहशी रविवारी, १३ मे १६६८ रोजी दिल्ली येथे १,८०,००० रुपयांच्या हुंड्यासहीत झाला. [] [] []

या दरम्यान, गुवाहाटी मुघलांकडून परत जिंकण्यात राजा सुपन्मुग यांना यश आले. हे लचित बोरफुकनच्या मदतीने सराईघाटच्या लढाईत होऊ शकले. लचित बोरफुकन यांनी या लढाईत कुप्रसिद्ध मुघल जनरल राम सिंह यांचा पराभव करून प्रसिद्धी मिळवली. जर अहोम आर्मीचे जनरल लचित बोरफुकन नसते, तर अहोमच्या बाजूने लढाई जिंकणे पूर्णपणे अशक्य होते. अशावेळी गुवाहाटी पूर्वीप्रमाणेच मुघल साम्राज्याचा भाग राहिला असता. लचित बोरफुकानांच्या हातात पराभूत झाल्यानंतरही, राम सिंह यांनी अहोम सैनिकांच्या अनेक गुणांबद्दल चांगले शब्द काढले होते. []

मग, काही वर्षांच्या कालावधीनंतर, प्रस्तावित करण्यात आले की गुवाहाटी मुघलांना द्यावी आणि त्या बदल्यात लालुकसोला, गुवाहाटी येथील अहोमचा व्हाइसरॉयला राजा बनवले जाईल. रमणी गभरुला जेव्हा हे कळले तेव्हा तिने तिचे मामा लालुकसोला बोरफुकन यांना पत्र लिहून विश्वासघात करण्याचे कृत्य करू नका असा इशारा दिला. तथापि, लालुकसोला बोरफुकनने त्याच्या थोरल्या भाचीचे ऐकले नाही. [१०]

संदर्भ

  1. ^ Neog, Maheswar (1983). Lachit Barphukan: The Victor of the Battle of Saraighat. Publications Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India. p. 28.
  2. ^ a b Pathak, Dayananda (2002). Pickings from the Cottonian. Cotton College Centenary Celebration Committee, Cotton College. p. 102. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "auto" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ Bhattacharyya, Malaysankar; Anandagopal, Ghosh (1989). Studies in history and archaeology: a miscellany. Indian Institute of Oriental Studies and Research. p. 58.
  4. ^ Sarma, Anjali (1990). Among the Luminaries in Assam: A Study of Assamese Biography. Mittal Publications. p. 188. ISBN 978-8-170-99207-3.
  5. ^ Sarkar, Jadunath (1947). Maasir-i-Alamgiri: A History of Emperor Aurangzib-Alamgir (reign 1658-1707 AD) of Saqi Mustad Khan. Royal Asiatic Society of Bengal, Calcutta.
  6. ^ Islamic Culture - Volumes 21-22. Islamic Culture Board. 1971. p. 112.
  7. ^ Bhuyan, Suryya Kumar (1957). Atan Buragohain and His Times: A History of Assam, from the Invasion of Nawab Mir Jumla in 1662-63, to the Termination of Assam-Mogul Conflicts in 1682. Lawyer's Book stall. p. 31.
  8. ^ Shashi, S. S. (1996). Encyclopaedia Indica: India, Pakistan, Bangladesh. Anmol Publications. p. 2078. ISBN 978-8-170-41859-7.
  9. ^ Pathak 2008, पान. 12.
  10. ^ Pathak 2008, पान. 13.

 

ग्रंथसूची

  • पाठक, गुप्तजीत (२००८). भारतीय स्वातंत्र्य चळवळीत असमिया महिला: विशेषतः कनकलता बरुआ. मित्तल प्रकाशन. ISBN ९७८-८-१८३-२४२३३-२.]