रफायेल
रफायेल Raphael (इटालियन) | |
---|---|
जन्म | २८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ उर्बिनो, मार्के |
मृत्यू | ६ एप्रिल, इ.स. १५२० रोम |
पेशा | चित्रकार, स्थापत्यकार |
कारकिर्दीचा काळ | रानिसां |
रफल याच्याशी गल्लत करू नका.
रफाएल्लो सान्झियो दा उर्बिनो (इटालियन: Raffaello Sanzio da Urbino) (२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ - ६ एप्रिल, इ.स. १५२०) हा रानिसां काळातील एक इटलियन चित्रकार व स्थापत्यकार होता. रफायेल, मिकेलेंजेलो व लिओनार्दो दा विंची ह्या त्रिकुटाला त्या काळातील सर्वोत्तम कलाकारांचा गट मानला जातो.
केवळ ३७ वर्षे आयुष्य जगलेल्या रफायेलने आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक रचनांची निर्मिती केली. या चित्रांतील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते.
ह्यांपैकी अनेक चित्रे व्हॅटिकन येथील पोपच्या निवासस्थानाच्या सजावटीसाठी रफायेलने रंगवली.
व्हॅटिकनमधील रफायेलच्या खोल्या
व्हॅटिकनमधील पोपच्या राजवाड्यामध्ये ४ खोल्या (Stanze di Raffaello) रफायेलने रंगवलेल्या चित्रांनी भरल्या आहेत.
चित्रदालन
साधारण दृष्य (१) | साधारण दृष्य (२) | पूर्वेकडील भिंत | दक्षिणेकडील भिंत | पश्चिमेकडील भिंत | उत्तरेकडील भिंत | छत | चित्रांची नावे |
---|---|---|---|---|---|---|---|
सेग्नातुराची खोली: १. Disputation of the Holy Sacrament, २. Cardinal and Theological Virtues, ३. The School of Athens, ४. The Parnassus व ५. छत. | |||||||
]], २. The Mass at Bolsena, ३. The Meeting of Leo the Great and Attila, ४. Deliverance of Saint Peter व ५. छत. | |||||||
बोर्गोतील विस्तवाची खोली: १. Battle of Ostia, २. The Fire in the Borgo, ३. The Coronation of Charlemagne, ४. The Oath of Leo III व ५. छत. | |||||||
कॉन्स्टॅन्टाईनची खोली: १. The Vision of the Cross, २. The Battle of the Milvian Bridge, ३. The Baptism of Constantine, ४. The Donation of Constantine व ५. छत. |