Jump to content

रत्‍नमाला (अभिनेत्री)

Ratnamala (en); रत्नमाला (hi); रत्नमाला (mr) actriță indiană (ro); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); שחקנית הודית (he); actriu índia (ca); भारतीय अभिनेत्री (hi); भारतीय चित्रपट अभिनेत्री (mr); Indian actress (en); actriz india (gl); ممثلة هندية (ar); 印度女演員 (zh); actriz india (es) कमल भिवंडकर (mr)
रत्नमाला 
भारतीय चित्रपट अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९२४
मृत्यू तारीखजानेवारी २४, इ.स. १९८९
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रत्नमाला (१९२४ - २४ जानेवारी १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका निभावल्या होत्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे दादा कोंडकेच्या आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. याचे मुख्य कारण म्हणजे दादा कोंडकेच्या प्रत्येक चित्रपटात रत्नमाला ह्या त्यांच्या आईची भूमिका पार पाडत असत.

त्यांचे मूळ नाव कमल भिवंडकर असे होते. तर त्यांच्या पतीचे नाव राजा पंडित होते.[] त्यांनी सर्वप्रथम इ.स. १९३८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी भगवा झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव कमल भिवंडकर पासून रत्नमालाबाई असे बदलण्यात आले. त्यानंतर प्रथमच त्यांनी ‘'माझी लाडकी’' (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका निभावली. तर ‘'स्टेशन मास्तर’' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.[]

त्यांचे काही गाजलेले प्रमुख मराठी चित्रपट पुढील प्रमाणे आहेत. ‘रुक्मिणी स्वयंवर’ (१९४६), ‘माझा राम’ (१९४९), ‘गोकुळचा राजा’ (१९५०), ‘रामराम पाव्हणं’ (१९५०), ‘सांगत्ये ऐका’ (१९५९), ‘मानिनी’ (१९६१), ‘रंगपंचमी’ (१९६१), ‘वैजयंता’ (१९६१), ‘गरिबाघरची लेक’ (१९६२), ‘जावई माझा भला’ (१९६२), ‘यालाच म्हणतात प्रेम’ (१९६४), ‘धन्य ते संताजी धनाजी’ (१९६८), ‘धर्मकन्या’ (१९६८), ‘कोर्टाची पायरी’ (१९७०), ‘काळी बायको’ (१९७०), ‘मुंबईचा जावई’ (१९७०)[]

इ.स. १९७१ मधील सोंगाड्या हा दादा कोंडकेचा पहिला मराठी चित्रपट.[] या चित्रपटात त्या प्रथम रत्नमाला यांनी दादा कोंडकेच्या आईची भूमिका निभावली. त्यानंतर त्यांनी ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ (१९७२), ‘थापाड्या’ (१९७३), ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५), ‘रामराम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८), ‘लक्ष्मी’ (१९७८), ‘ह्योच नवरा पाहिजे’ (१९८०), ‘आली अंगावर’ (१९८२), ‘नवरे सगळे गाढव’ (१९८२), ‘ढगाला लागली कळ’ (१९८५), ‘मुका घ्या मुका’ (१९८७) अशा प्रत्येक चित्रपटात त्यांनीच दादा कोंडकेच्या आईची भूमिका पार पाडली.[][]

संदर्भ

  1. ^ a b c "Ratnamala". Cinemazzi. 2024-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "दादा कोंडके".
  3. ^ एकटा जीव.
  4. ^ "सिनेसृष्टीचा 'दादा'माणूस..."

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रत्‍नमाला (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)