रणजितसिंह डिसले
रणजितसिंह डिसले | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | शिक्षक |
पुरस्कार | ग्लोबल टीचर प्राइज |
रणजितसिंह डिसले ( ५ आगस्ट १९८८) हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.[१]
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.[२] विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले.[१][३][४][५]
ग्लोबल टीचर प्राइज
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.[६] या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[३][४] या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल १२ हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.[१][२][७]
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.[२]
विवाद
सोलापूरचे शिक्षण विभाग व डाएट (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांच्या म्हणण्यानुसार डिसले सरांना "डाएट'वर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती देण्यात आली होती परंतु ते तिकडे फिरकले देखील नाहीत.[८][९]
बाह्य दुवे
- रणजितसिंह व्यापार लिंक्डइनवर
- ग्लोबल टीचर प्राइज Archived 2020-12-03 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ a b c "Ranjitsinh Disale". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ a b c "BBC News मराठी".
- ^ a b "सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'". Maharashtra Times. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ a b "सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार". Loksatta. 2020-12-03. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-12-03). "Maharashtra Teacher wins Global Prize: सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर". marathi.abplive.com. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "Global Teacher Prize". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ "Global Teacher Prize 2020 Finalists". Varkey Foundation (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.
- ^ लोकसत्ता विश्लेषण : 'ग्लोबल टीचर' रणजित डिसलेंच्या राजीनाम्यापर्यंत विषय जाण्याइतकं घडलंय तरी काय?"
- ^ Solapur: प्राचार्यांचे स्पष्टीकरण! "डाएट'कडे डिसले गुरुजी फिरकलेच नाहीत