Jump to content

रजित अमुनुगामा

अमुनुगामा राजपक्ष राजकरुणा ॲबेकून पंडित वसलामुदियान्से रालाहामिल्लगे रजित कृष्णांत बंदारा अमुनुगामा किंवा आर.के.बी. अमुनुगामा किंवा रजित अमुनुगामा (२२ एप्रिल, १९६९:मावगेल्ला, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.

अमनुगामा कुरुनेगला आणि तमिळ युनियन क्लबकडून एकूण १०२ प्रथम-श्रेणी आणि २० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.