Jump to content

रजनी टिळक

रजनी टिळक यांनी २०१७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या अनुवादित कवितांच्या पुस्तका सहीत फोटो. येथे त्यांना दलित महिला स्पीक आउट कॉन्फरन्समध्ये जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. []

रजनी टिळक (१७ मे १९५८ ते ३० मार्च २०१८) ह्या भारतातील प्रमुख दलितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच त्या दलित स्त्रीवादाचा [] आणि त्या संबधीत लेखन करतात. [] त्यांनी सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडियाच्या कार्यकारी संचालक म्हणून काम केले, [] नॅशनल असोसिएशन ऑफ दलित ऑर्गनायझेशन []ची सह-स्थापना केली आणि दलित लेखक संघाच्या (दलित लेखक गट) अध्यक्ष म्हणून काम केले. []

प्रारंभिक जीवन

टिळकांचा जन्म दिल्ली येथे २७ मे, १९५८ रोजी वसाधारण कुटुंबात झाला. तिचे वडील एक शिंपी होते ज्यांचे पूर्वज उत्तर प्रदेश राज्यातून दिल्लीला स्थलांतरित झाले होते. सात मुलांपैकी पहिली असल्याने तिला आर्थिक निधीअभावी परिचारिका बनण्याची आकांक्षा सोडावी लागली. तिने तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी नोकरी स्वीकारली. [] तिला लेखनाची आवड होती. तिची पहिली कविता "का से कहू दुख अपना" लिहून तिने लेखनाची सुरुवात केली होती. [] स.न. १९७५ मध्ये तिने उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्टेनोग्राफी, कटिंग आणि टेलरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेतला.

सक्रियता आणि कारकीर्द

दिल्लीतील आयटीआयमध्ये महाविद्यालयात असताना, त्यांनी लिंग आधारित भेदभावाचा निषेध करण्यासाठी मुलींसाठी एक संघ आयोजित केला होता. या गटाला प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन (पी एस यु) मध्ये विलीन करून त्या एक नेता बनल्या. नंतर त्या वैचारिक आणि राजकीय मतभेद झाल्यामुळे त्यांच्यापासून विभक्त झाल्या. वेतनश्रेणी नियमित करण्याच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ४००० अंगणवाडी सेविकांची एक मजबूत संघटना तयार केली. [] वर्षानुवर्षे रजनी टिळक दलित सक्रियतेमध्ये सामील झाले आणि जातीच्या भेदभावाला आव्हान देऊनही त्यांनी आपला ठसा उमटवला. [१०] त्यांनी १९७२ मध्ये मथुरा बलात्कार प्रकरणावर संपूर्ण दिल्लीत आंदोलने केली आणि त्या सहेली या स्वायत्त महिला गटाशी संबंधित झाल्या. तिथून पुढे त्यांनी आरोग्य, स्वच्छता, कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन, बलात्कार, विनयभंग इत्यादी विषयांवर काम करण्यास सुरुवात केली. [११]

१९८० च्या दशकात रजनी टिळकांनी दिल्लीत भारतीय दलित पँथर्ससोबत युनियन सुरू केले. त्यांनी अहावान नावाचा दलित नाट्यगट उघडला आणि युवा अभ्यास मंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा कार्यक्रम सुरू केला. [१२]

त्या एनएसीडीॲओआर (नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनायझेशन्स), सीएडीएएम (सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया), एन् एफ डी ड्ब्ल्यु ( नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमन ), राष्ट्रीय दलित महिला आंदोलन (आर.डी.एम.ए) आणि इतर अनेक संघटनांशी संबंधित होत्या. [१३]

स.न. २०११ मध्ये, बॉलीवूड चित्रपट आरक्षण (प्रकाश झा दिग्दर्शित) या चित्रपटात दलितांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला होता, आणि त्यामुळे वादंग निर्माण झाले होते. रजनी टिळकांना चित्रपट रिलीज होण्यापूर्वी पाहण्यास सांगितले होते. [१४] २०१२ मध्ये, त्या दलित आणि गैर-दलित लेखकांच्या, विद्वान, आणि कार्यकर्ते या पासून बनलेल्या समितीत भाग घेतला होता. या समितीवर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नॅशनल कौन्सिल (एनसीईआरटी) बरोबरीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका शालेय पुस्तकांमध्ये मांडण्याची जबाबदारी होती. [१५]

साहित्यिक काम

  • भारत की पहली शिक्षिका - सावित्रीबाई फुले (१९९८) [१६]
  • पदचाप (२०००) - कवितेचा खंड
  • बुद्ध ने घर क्यों छोडा (२००५) [१७]
  • समकालीन भारतीय दलित महिला लेखन खंड. १ (२०११) - दलित महिलांचे लेखन संकलित आणि संपादित
  • समकालीन भारतीय दलित महिला लेखन खंड. २ (२०१५) [१८]
  • हवा से बेचेन युवतियां (२०१५) - कवितेचा खंड
  • दलित स्त्री विमर्ष अवुम पत्रकारिता (२०१६)
  • समकालीन भारतीय दलित महिला लेखन खंड. ३ (२०१७) [१९]
  • सावित्रीबाई फुले रचना समग्र (२०१७) - दलित कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले [२०]
  • अपनी जमीन अपना आसमान (२०१७) - आत्मचरित्र [२१]
  • डॉ आंबेडकर और स्त्री चिंतन के दस्तावेज (२०१८) - संकलित आणि संपादित [२२]

पुरस्कार

  • नॅशनल कमिशन फॉर वुमन (२०१३) कडून उत्कृष्ट महिला अचीवर्स पुरस्कार
  • दलित महिला स्पीक आउट कॉन्फरन्स (२०१७) मध्ये जीवनगौरव पुरस्कार

मृत्यू

रजनी टिळकांचे ३० मार्च २०१८ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना मणक्याच्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. [२३] त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी, लेखक, अभिनेता आणि कार्यकर्त्या ज्योत्स्ना सिद्धार्थ आहेत.

त्यांच्या निधनाने अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला. देशभरात शोकसभेच्या बैठका घेण्यात आल्या आणि सोशल मीडिया वेबसाइटवर त्यांची मैत्रीण कविता श्रीवास्तव यांनी पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पी यु सी एल) या संस्थेच्या नेत्यांसह श्रद्धांजली वाहीली. [२४]

संदर्भ

  1. ^ "Rajni Tilak (1958–2018)". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 53 (17): 7–8. 2015-06-05.
  2. ^ "Who will clean up the lives of manual scavengers?". epaper.timesofindia.com. 2018-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ "An Interview with Rajni Tilak". Roundtable India. 17 January 2013.
  4. ^ "About Us - Centre for Alternative Dalit Media". www.cadam.org.in. 2018-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-20 रोजी पाहिले.
  5. ^ "National Association of Dalit Organisations-NADO - Local Business | Facebook". www.facebook.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-20 रोजी पाहिले.
  6. ^ "Rajni Tilak – Leading Voice of Dalit Activism Passes Away". She The People. 31 March 2018.
  7. ^ Angmo, Deachen (2018-04-25). "Rajni Tilak: A Leading Dalit Feminist Of Our Times". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2019-03-14 रोजी पाहिले.
  8. ^ "Museindia". www.museindia.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  9. ^ Angmo, Deachen (2018-04-25). "Rajni Tilak: A Leading Dalit Feminist Of Our Times". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2019-03-14 रोजी पाहिले.
  10. ^ "An Interview with Rajni Tilak". Roundtable India. 17 January 2013.
  11. ^ kuffir. "Need to redefine Dalit Movement: Rajni Tilak". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2019-03-14 रोजी पाहिले.
  12. ^ Angmo, Deachen (2018-04-25). "Rajni Tilak: A Leading Dalit Feminist Of Our Times". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2019-03-14 रोजी पाहिले.
  13. ^ Thakur, Sandali. "Rajni Tilak (1958-2018) was an activist and poet who fought tirelessly against caste and patriarchy". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2019-03-14 रोजी पाहिले.
  14. ^ "HC asks for home dept's views on quota movie - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-02-17 रोजी पाहिले.
  15. ^ "Humour is by no means exempt from prejudice". The Hindu. 8 June 2012.
  16. ^ MediaVigil (2019-01-03). "सावित्रीबाई फुले: मनुवादी अंधकार में किरण की तरह फूटी युगनायिका !". MediaVigil (हिंदी भाषेत). 2019-03-19 रोजी पाहिले.
  17. ^ "कर्मकर्ता और कवि रजनी तिलक ने पूरी ज़िंदगी मेहनतकशों की शोषण मुक्ति और सम्मान के नाम कर दिया- जसम" (इंग्रजी भाषेत). 2018-03-31. 2019-03-19 रोजी पाहिले.
  18. ^ "hindibook.com: SAMKALIN BHARATIYA DALIT MAHILA LEKHAN RAJNI TILAK HB 9789383513468". hindibook.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  19. ^ "hindibook.com: SAMKALIN BHARTIYA DALIT MAHILA LEKHAN-V.3 (ATMKATHA VISHESH) RAJNI TILAK (Ed.) HB 9789383515042". hindibook.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  20. ^ "hindibook.com: SAVITRIBAI PHULE RACHNA SAMAGRA RAJNI TILAK (Ed.) HB 9788193381526". hindibook.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  21. ^ "hindibook.com: APNI JAMIN APNA ASMAN RAJNI TILAK HB 9789382543848". hindibook.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  22. ^ "hindibook.com: DR. AMBEDKAR AUR STRI CHINTAN KE DASTAVEZ RAJNI TILAK (Comp. & Ed.) HB 9789383515103". hindibook.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  23. ^ "Dalit writer Rajni Tilak passes away". United News of India. 31 March 2018.
  24. ^ "The sceptical Dalit, Left feminist: my dear friend Rajni Tilak". National Herald India. 1 April 2018.