रघुराम राजन
रघुराम राजन | |
गव्हर्नर, भारतीय रिजर्व बँक | |
कार्यकाळ ४ सप्टेंबर २०१३ – ४ सप्टेंबर २०१६ | |
मागील | डॉ. डी सुब्बराव |
---|---|
पुढील | उर्जीत पटेल |
जन्म | ३ फेब्रुवारी, १९६३ भोपाळ,मध्य प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पत्नी | राधिका पुरी |
गुरुकुल | आयआयटी दिल्ली आयआयएम अहमदाबाद एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट |
रघुराम राजन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. सप्टेंबर ४, इ.स. २०१३ रोजी त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे(IMF) प्रमुख अर्थतज्ज्ञ होते.
राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केली.