रघुनाथ शेवगावकर
डॉ. रघुनाथ शेवगावकर हे पुणे विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू होते. कुलगुरुपदी निवड होण्यापूर्वी इ.स. १९८७ पासून ते मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
शिक्षण
शेवगावकर यांचे शालेय शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झाले. इ.स. १९७५ साली त्यांनी शिवाजी विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर आयआयटी कानपूर येथून एम. टेक. पूर्ण केले. बंगळूर येथील 'रामन रिसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये तसेच अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंड'मध्ये त्यांनी संशोधनकार्य केलेले आहे.