रघुनाथ बोरकर
डॉ. र.रा.बोरकर | |
---|---|
जन्म नाव | रघुनाथ रा. बोरकर |
जन्म | ४ सप्टेंबर इ.स. १९५१ |
शिक्षण | एम.ए., पीएचडी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पुरातत्त्वशास्त्र, इतिहास, संग्रहालयशास्त्र |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | ऐतिहासिक |
डॉ. रघुनाथ रा. बोरकर हे लेखक असून त्यांनी मुख्यतः विदर्भातील पुरातत्त्वीय स्थळांवर लेखन केले आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये विभागातील निवृत्त अधिकारी आहेत.
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भोपाळ विद्यापीठातून संग्रहालयशास्त्र विषयाची पदवीका प्राप्त केली. पुढे विद्यावाचस्पती पदवीही मिळवली.
किल्ले इतिहास व पुरातत्त्वशास्त्र या विषयावर त्यांनी काही ग्रंथलेखन केले, तसेच याच विषयांवर १४५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत.
ग्रंथलेखन
- रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले
- महाकाली चंद्रपूरची
- रामटेक
- कोहळी समाज आणि त्यांचा इतिहास
- किल्ले गाविलगड नरनाळा
- पुरातत्त्वीय शोध
- भारतीय पुरातत्त्वशास्त्र
- नांदीकटातील मंदिरे
- चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचे पुरातत्व
- संग्रहालय शास्त्र
- मध्ययुगीन विदर्भाचा इतिहास
- वाढोना येथील विठ्ठल-रूक्मिनी मंदिर
- चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास