Jump to content

रघुनंदन पणशीकर

रघुनंदन पणशीकर
[[चित्र:Raghunandan Panshikar.jpg
Raghunandan Panshikar
|250px]]
पं. रघुनंदन पणशीकर
आयुष्य
जन्म १४ मार्च १९६३
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आईविजया कुलकर्णी
वडील प्रभाकर पणशीकर
जोडीदार अपर्णा पणशीकर
अपत्ये देविका पणशीकर, पिनाकीन पणशीकर
संगीत साधना
गुरू किशोरी आमोणकर
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
घराणे जयपूर घराणं, जयपूर-अत्रौली घराणं
संगीत कारकीर्द
कार्य शास्त्रीय गायन
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ.स. २००४
गौरव
गौरव श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, स्वरयोगिनी डॉ. प्रभा आत्रे पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, म. टा.(महाराष्ट्र टाइम्स) सन्मान,

पंडित रघुनंदन पणशीकर (जन्म १९६३) हे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायन शैली - पूर्ण भरलेला आकार, तान, लयकारी  आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्रीय गायनात त्यांचे एक अविभाज्य स्थान निर्माण करते. एक अष्टपैलू कलाकार असल्याचे सर्व गुण त्यांच्या गायनात अगदी सहजपणे दिसून येतात, ख्याल गायकी असो अथवा भजन, ठुमरी असो वा गझल किंवा नाटय संगीत ते अगदी सहजपणे गातात. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्तकर्ते, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी  भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे. 

पुरस्कार

  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार (१५-७-२०१७)