Jump to content

रक्तचंदन

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत "टेरोकाप्स सॅन्टलिनस' असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात.

रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.


रक्तचंदनाचे झाड


रक्तचंदनाचे खोड व पाने


  • मुकामार,शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात.मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात.अशावेळी रक्तचंदन सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक द्यावा .